Naveen Ul Haq Brilliant Spell : आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात विराट कोहली (Virat Kohli) सोबतच्या वादामुळे प्रकाशझोतात आलेला अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक (Naveen Ul Haq) गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या नवीन-उल-हकने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएल 2023 मधील एलिमिनेटर सामन्यात केवळ 38 धावांत चार विकेट घेतल्या. त्याने मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज तंबूत माघारी धाडले. नवीनने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव कॅमेरॉन ग्रीन आणि तिलक वर्मा यांच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या.


कोहलीशी पंगा घेतल्यानंतर नवीन-उल-हक दमदार खेळी


इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचं आव्हानं संपवलं. या सामन्यात लखनौचा गोलंदाज नवीन-उल-हकचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नवीन-उल-हकने चमकार कामगिरी केली. त्याने रोहित शर्मा 11 धावांवर, सूर्यकुमार यादवला 33 धावांवर आणि कॅमेरॉन ग्रीनला 33 धावांवर आणि तिलक वर्मा 26 धावांवर बाद केलं. विकेट घेतल्यानंतर त्याने मैदानावर केलेलं सेलिब्रेशनही चर्चेचा विषय ठरला आहे. नवीनच्या या दमदारल खेळीनंतर नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 


रोहित, सूर्यासह महत्वाचे 4 गडी तंबूत धाडले


चौथ्या षटकात नवीन-उल-हकने रोहित शर्माला 10 चेंडूत 11 धावांवर बाद केलं. नवीनने कर्णधार रोहित आयुष बडोनीकरवी झेलबाद केल्यावर मुंबईला पहिला झटका दिला. पुढच्याच पाचव्या षटकात इशान किशनही थोडक्यात बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 28 चेंडूत 50 धावांची दमदार भागीदारी केली. त्यानंतर बाराव्या षटकात नवीनने चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला तंबू धाडलं. सूर्याने 20 चेंडूत 33 धावा केल्या. याचं षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीन 23 चेंडूत 41 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर नवीनने तिलक वर्माला माघारी पाठवलं. तिलकने  22 चेंडूत 26 धावा केल्या. नवीनने तिलकला दीपक हुडाकडून झेलबाद केलं.


सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस


अनेकांनी सोशल मीडियावर नवीन-उल-हकच्या खेळीचं कौतुक केलं आहे. 


















दरम्यान, नवीनने मैदानावरील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवीनला स्टँडवरून पाहून चाहते विराट कोहलीच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत. नवीन फलंदाजीसाठी उभा असताना त्याचे मागे प्रेक्षकांची कोहलीच्या नावाने घोषणाबाजी सुरु होती. याआधीही इतर संघांसोबतच्या लखनौच्या सामन्यांवेळीही स्टेडिअममध्ये कोहली-कोहली नावाने घोषणा देण्यात आल्या होत्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


IPL 2023 : रोहित शर्माला बाद केल्यावर नवीन-उल-हकनं केलं असं काही की... सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल


Maharashtra Board HSC Result 2023 LIVE हा निकाल एबीपी माझाच्या http://mh12.abpmajha.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे.


निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'चा लाईव्ह ब्लॉग पाहा