Naveen Ul Haq Celebration : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमात अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू (Afghanistan Cricket) नवीन-उल-हक चर्चेत आला. आयपीएल 2023 मध्ये लखनौ संघाकडून खेळणारा गोलंदाज नवीन-उल-हक विराट कोहलीसोबत झालेल्या वादामुळे सोशल मीडिया प्रकाशझोतात आला. आता मुंबई विरुद्धच्या सामन्यानंतर नवीन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.  या सामन्यात नवीनने मुंबईचे महत्त्वाचे चार गडी बाद केले. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केल्यानंतर नवीनने केएल राहुलच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.


रोहित शर्माला बाद केल्यावर नवीन-उल-हकचं सेलिब्रेशन


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवलं आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 182 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौ संघाला फक्त 101 धावांपर्यंतच मजल मारता आली.


नवीन-उल-हकचा व्हिडीओ व्हायरल


मुंबई विरुद्धच्या सामन्यात लखनौचा पराभव झाला असला, तरी नवीन-उल-हकने चांगली कामगिरी करत चार बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 38 धावा देऊन 4 बळी घेतले. नवीन-उल-हकचं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडीओ :






मुंबईचा लखनौवर 81 धावांनी दणदणीत विजय


आकाश मधवालच्या (Akash Madhwal) भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली. मुंबई इंडियन्स दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.  लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या विजयासह मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. 26 मे 2023 रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. गुजरात आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ 28 मे रोजी चेन्नईसोबत भिडणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


MI vs GT : मुंबईला आता गुजरातचं आव्हान, दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचा थरार; कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?