Kane Williamson Ruled out of ICC World Cup 2023 : विश्वचषकआधी (World Cup 2023) न्यूझीलंडसाठी (New Zeland Cricket Team) अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार (New Zeland Captain) केन विल्यमसन (Kane Willliamson) विश्वचषकात खेळू शकणार नाही. आयपीएल सामन्यादरम्यान विल्यमसनला दुखापत झाली, त्यामुळे तो आयपीएलमधून आधीच बाहेर गेल आहे. विल्यमसनच्या उजव्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असून त्यामुळे कर्णधार विल्यमसन या मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 


कर्णधार केन विल्यमसन विश्वचषकाला मुकणार


गुजरात टायटन्सच्या पहिल्या आयपीएल सामन्यात सीमारेषेवर झेल घेताना विल्यमसनला दुखापत झाली होती. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, दुखापत इतकी गंभीर आहे की, केन विल्यमसनचं वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे निश्चित आहे. आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विल्यमसन नुकताच न्यूझीलंडला परतला आहे. तिथे त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहे. येत्या तीन आठवड्यांत विल्यमसनवर शस्त्रक्रिया होणार आहे. गुडघ्याभोवतीची सूज कमी झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.






न्यूझीलंड संघाला मोठा झटका


केन विल्यमसनची दुखापत आणि त्याची शस्त्रक्रिया पाहता तो 2023 च्या विश्वचषकातून बाहेर जाऊ शकतो, असं मानलं जात आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात विश्वचषक 2023 होणार आहे. दुसरीकडे, पुढील तीन आठवड्यांत केन यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शस्त्रक्रियेनंतर इतक्या कमी वेळेत केन दुखापतीतून सावरणं फार कठीण असेल. हे पाहता तो 2023 च्या विश्वचषकाच्या निवडलेल्या संघात सामील नसेल.


आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विल्यमसनला दुखापत


हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला आहे. केन विल्यमसन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेला. चेन्नईविरोधातील सामन्यात फिल्डिंग करताना विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती. दोन खेळाडूंनी विल्यमसनला मैदानाबाहेर नेले होते. विल्यमसनच्या पायाचे एक्स रे आणि स्कॅन करण्यात आले. त्यानंतर विल्यमसन आयपीएलमधून बाहेर गेला. आता त्याची दुखापत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. 


न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक काय म्हणाले?


न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितलं आहे की, 'तुम्ही सुरुवातीला केनसारखा खेळाडू निवडता परंतु संघात कर्णधार आणि त्याच्यासारखी व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. तो बरा होईल ही आशा आम्ही अजून सोडलेली नाही, पण सध्या तरी तसं होताना दिसत नाही. या क्षणी आमचा पहिला विचार केन आहे. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. ESPNcricinfo शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.