Kane Williamson Injury : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये सलामीची लढत सुरु आहे. पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला आहे.
ऋतुराज गायकवाड याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात विल्यमसन दुखापतग्रस्त झाला आहे. विल्यमसनला उपचारासाठी मैदानाबाहेर नेहण्यात आले आहे. मिळाल्या वृत्तानुसार, विल्यमसन याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. विल्यमसनची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. डॉक्टर सध्या विल्यमसन याच्यावर उपचार करत आहेत.
फिल्डिंग करताना विल्यमसनला दुखापत झाली आहे. गुडघ्याला दुखापत झाली आहे. दोन खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर नेले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फिल्डिंग करताना 13 व्या षटकात जोशुओ लिटिलच्या चेंडूवर ही दुर्घटना घडली. ऋतुराज गायकवाड याने मोठा फटका मारला, झेल घेण्याच्या नादात विल्यमसनला दुखापत झाली. विल्यमसन जवळपास तीन सेकंद हवेत झेपावत चेंडू आतामध्ये टाकला. पण जमीनीवर पडताना पायाला दुखापत झाली. विल्यमसन याच्या दुखापतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. फिजिओ विल्यमसनच्या दुखापतीवर काम करत आहेत. विल्यमसनच्या दुखापतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने -
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने फटकेबाजी केली.
ऋतुराज वन मॅन शो -
एका बाजूला विकेट पडत असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराज गायकवाड याने 9 षटकार आणि चार चौकार लगावले. अल्जारी जोसेफ याने धोकादायक ऋतुराजला बाद केले. ऋतुराज गायकवाड याच्या खेळीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभारली.
आयपीएलची दिमाखात सुरुवात -
अरिजीत सिंह याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक थिरकले. कलाकारांच्या दमदार परफॉर्मनंतर आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.