MS Dhoni IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार की नाही? याबाबत क्रिडाविश्वात गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली होती. राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनीनं अशा चर्चांना पूर्णविराम लावला आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात आलेल्या धोनीनं पुढच्या वर्षीही चेन्नईसाठी क्रिकेट खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. धोनीच्या या निर्णयामुळं त्याच्या चाहत्यांमध्ये आणि चेन्नईच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम अतिशय खराब ठरला आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाला 13 पैकी 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. चेन्नईच्या संघ आयपीएल 2022 मधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चेन्नईचा राजस्थानविरुद्धचा सामना आता केवळ औपचारिकता आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं पुढील हंगामात खेळाडू म्हणून संघात सामील होणार असल्याची चांगली बातमी चाहत्यांसाठी आली. तसेच तो कर्णधारपदी कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक करताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, तो पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार आहे. कारण तो चेन्नईच्या चाहत्यांना निराश करू इच्छित नाही. ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार, एमएस धोनीनं संघ व्यवस्थापनाला सांगितलं आहे की "तो आयपीएल 2023 साठी उपलब्ध असेल. सीएसकेच्या 8 सामन्यांत कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणारा रवींद्र जडेजाही संघात सामील होण्याची शक्यता आहे."
हे देखील वाचा-
RR vs CSK: इमरान ताहिराचा विक्रम मोडण्यासाठी युजवेंद्र चहल उतरणार मैदानात
RR vs CSK, Head to Head : राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी