RR vs CSK : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्स आणि आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK)  हे संघ मैदानात उतरणार आहेत. राजस्थानच्या संघाला प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी आजचा विजय महत्त्वाची भूमिका बजावेल. आज जिंकताच ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण पराभूत झाल्यास देखील त्यांचा नेट रनरेट चांगला असल्याने त्यांचं पुढे जाणं जवळपास निश्चित आहे. तर चेन्नई सुपरकिंग्सचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने ते स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.

Continues below advertisement

गुणतालिकेचा विचार करता राजस्थान रॉयल्सने 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपरकिंग्सने 13 पैकी 9 सामने गमावल्याने ते नवव्या स्थानावर आहेत. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास असल्यानं दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.

कधी आहे सामना?

Continues below advertisement

आज 20 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि आणि चेन्नई सुपरकिंग्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

राजस्थान रॉयल्स आणि आणि चेन्नई सुपरकिंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 

हे देखील वाचा-