RR vs CSK, Pitch Report : आज आयपीएलच्या (IPL 2022) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (RR vs CSK) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. राजस्थानच्या संघाला प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी आजचा विजय महत्त्वाची भूमिका बजावेल. आज जिंकताच ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर चेन्नई सुपरकिंग्सचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने ते स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.
राजस्थानकडून बरेच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जोस, यशस्वी, शिमरॉन यांच्यासह गोलंदाजी प्रसिध, चहल, बोल्ट यांची कामगिरी उत्तम दिसत आहे. चेन्नईकडून फलंदाजीची सर्व मदार ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे यांच्यावर आहे. या दोघांव्यतिरिक्त धोनीनेही काही सामन्यात जलवा दाखवला आहे. इतर फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीत मुकेश चौधरी आणि तिक्षणा यांचा अपवाद वगळता गोलंदाज प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरत आहेत. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
राजस्थान विरुद्ध चेन्नई अशी असेल ड्रीम 11 (RR vs CSK Best Dream 11)
विकेटकीपर- जोस बटलर, संजू सॅमसन
फलंदाज- देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, यशस्वी जैस्वाल
ऑलराउंडर- मोईन अली, शिमरॉन हेटमायर
गोलंदाज- मुकेश चौधरी, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. या मैदानात गोलंदाजांसह फलंदाजांनाही मदत मिळते त्यामुळे एक चुरशीचा सामना क्रिकेटरसिकांना पाहायला मिळू शकतो. त्यात सामना सायंकाळच्या सुमारास असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.
हे देखील वाचा-