IPL 2025 Mega Auction CSK Update : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तयारी सुरू केली आहे. संघ लवकरच कायम ठेवलेल्या आणि जाहीर केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करेल. याआधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. एका रिपोर्टनुसार, धोनी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (ऑक्टोबर) बैठक घेऊ शकतो. धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. यासोबतच तो खेळल्यास किती पगार घेणार हेही ठरवलेले नाही.


स्पोर्ट्सच्या एका बातमीनुसार, धोनी 29 किंवा 30 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतो. 28 ऑक्टोबरपर्यंत ते बैठकीसाठी उपलब्ध नाहीत. धोनी आणि सीएसकेच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीनंतरच पुढील हंगामाची प्रक्रिया निश्चित केली जाईल. धोनी खेळला तर तो कॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार की अनकॅप्ड म्हणून खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न असेल. धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळला तर पगारात तोटा होईल.




धोनीचा पगार कसा ठरणार?


धोनी 2018 पासून आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. याआधी तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून दोन हंगामात खेळला होता. पण सीएसकेवरील बंदी उठताच तो संघात सामील झाला. त्याला 2022 च्या हंगामापासूनच 12 कोटी रुपये पगार मिळत आहे. मात्र आता किती मिळणार हे या बैठकीनंतर ठरवले जाईल. धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळला तर पगार कमी होईल.




आयपीएल 2025 चा मेगा लिलाव रियाधमध्ये होऊ शकतो. याआधी सर्व संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला मेगा लिलाव होऊ शकतो. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.


हे ही वाचा -


ICC Test Rankings Update : पुणे कसोटीआधी ऋषभ पंतचा धमाका; क्रमवारीत किंग कोहलीला टाकले मागे, सर्फराजने घेतली गरूड झेप


IND vs NZ Pune Test : 'सोशल मीडिया आमची प्लेइंग इलेव्हन ठरवणार नाही...' KL राहुलच्या टीकाकारांवर संतापला गौतम गंभीर