Mayank Yadav IPL 2025 Mega Auction : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मयंक यादवलाही संधी देण्यात आली होती. तसेच त्याला पहिल्यांदा भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेत मयंकला जास्त विकेट घेण्यात यश आले नाही, मात्र त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आता बीसीसीआयच्या एका नियमांमुळे युवा वेगवान गोलंदाजावर पैशांचा वर्षाव होणार आहे.
BCCIचा एका नियमांमुळे मयंक यादव होणार करोडपती
खरंतर, मयंक यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता आयपीएल 2025 च्या रिटेन्शन नियमांनुसार, मयंक कॅप्ड खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. म्हणजेच लखनऊ सुपर जायंट्स संघाने आता मयंकला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मयंकला 11 कोटी रुपये द्यावे लागतील. नियमांनुसार, संघ 18 कोटी रुपये खर्च करून पहिला खेळाडू, दुसरा 14 रुपये आणि तिसरा 11 कोटी रुपये खर्च करून कायम ठेवू शकतो. त्याचवेळी संघाला 18 आणि चौथ्या खेळाडूसाठी 14 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार मयंकला रिटेन करण्यासाठी लखनौला 11 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
वृत्तानुसार, लखनऊ सुपर जायंट्स संघ मयंक यादवला कायम ठेवू इच्छित आहे. पीटीआयशी बोलताना, आयपीएलची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, लखनऊ संघ मयंकला कायम ठेवू इच्छित आहे. आयपीएल 2024 मध्ये मयंक त्याच्या वेगामुळे चर्चेत आला होता. मयंकने आयपीएलच्या मागील हंगामात चार सामन्यांत एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. या युवा वेगवान गोलंदाजाने स्पर्धेत ताशी 156.7 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला.
मयंक छाप सोडण्यात ठरला यशस्वी
मयंक यादव आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे. युवा वेगवान गोलंदाजाने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 21 धावा देत एक विकेट घेतली. मयंकने त्याच्या कारकिर्दीतील पहिले मेडन ओव्हर टाकले आणि असे करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला.
हे ही वाचा -
IPL 2025 मेगा लिलावाबाबत मोठी अपडेट..., श्रीमंतांच्या 'या' शहरात समुद्र किनारी होणार लिलाव