MS Dhoni, IPL 2024 : एमएस धोनी वयाच्या 42 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी फलंदाजी करत आहे. धोनीनं (MS Dhoni) पुन्हा एकदा अखेरच्या दोन षटकात वादळी फलंदाजी केली. धोनीनं मुंबईविरोधात (MI vs CSK) अखेरच्या चार चेंडूवर 20 धावांचा पाऊस पाडला होता, त्याच सामन्यात निर्णायाक ठरल्या होत्या. आजही एमएस धोनीने 9 चेंडूमध्ये 28 धावांची विस्फोटक खेळी केली. धोनीने 20 व्या षटकातील चार चेंडूवर आज 16 धावा लूटल्या. लखनौविरोधात (LSG vs CSK)आजही या धावा महत्वाच्या ठरतील. धोनीच्या फलंदाजीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
लखनौविरोधात चेन्नईची फलंदाजी ढेपाळली होती. दिग्गजांनी नांगी टाकली. रवींद्र जाडेजानं किल्ला लढवत सन्मानजक धावसंख्या उभारली होती. पण अखेरीस धोनीनं शानदार फटकेबाजी करत त्याला चार चाँद लावले. 13 चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानावर उतरला होता. धोनीने 9 चेंडूमध्ये नाबाद 28 धावांची खेळी केली. या खेळीमद्ये धोनीने दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. धोनीने अखेरच्या चार चेंडूवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. धोनीने अखेरच्या चार चेंडूवर 16 धावा वसूल केल्या. धोनीनं यश ठाकूरला 101 मीटर लांब षटकार मारला.
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी फक्त अखेरच्या षटकामध्ये फलंदाजीला येत आहे. तो येतो आणि फक्त गोलंदाजांचा समाचार घेतो. धोनीनं यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त 34 चेंडूचा सामना केला आहे. धोनीनं यंदाच्या आयपीएल 87 धावा केल्या आहेत. 42 वर्षीय धोनी यंदाच्या हंगामात पाच वेळा फलंदाजीला आला, अन् पाचही वेळा नाबाद राहिला. धोनीनं आरसीबीविरोधात 16 चेंडूमध्ये नाबाद 37 धावांची खेळी केली. मुंबईविरोधात धोनीने 4 चेंडूवर 20 धावांचा पाऊस पाडला. आज धोनीने 9 चेंडूमध्ये 28 धावा केल्या आहेत.
20 व्या षटकात सर्वाधिक षटकार माऱणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीनं 20 व्या षटकांमध्ये आतापर्यंत 65 षटकार ठोकले आहेत. धोनीने आज केलेल्या वादळी 28 धावांमुळेच चेन्नईने 176 धावांपर्यंत मजल मारली.
आणखी वाचा :
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल