लखनौ :आयपीएलमध्ये (IPL 2024) आज लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात 34 वी मॅच होणार आहे. या मॅचसाठी लखनौचा कॅप्टन केएल राहुल जोरदार तयारी करत आहे. केएल राहुल सराव सत्रात जोरदार तयारी करताना दिसून आला आहे. केएल राहुल सोबत त्याची पत्नी अथिया शेट्टी देखील लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये दिसून आली. सराव सत्रातील केलएल राहुल आणि अथिया शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये केएल राहुल पाणी पिताना दिसून येत आहे. यावेळी तिथं अथिया शेट्टी उभी राहिलेली दिसून येते.


लखनौ सुपर जाएंटसचा कॅप्टन केएल राहुल याचा वाढदिवस 18 एप्रिल रोजी होता. अथिया शेट्टीनं राहुलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक पोस्ट शेअर केली होती. अथिया शेट्टी मैदानाबाहेर असो की मैदानावर मॅच सुरु असो ती राहुलच्या समर्थनात उभी राहिलेली दिसते. 






यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं आतापर्यंत सहा मॅच खेळल्या आहेत. या पैकी तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला तर तीन मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लखनौ सुपर जाएंटस गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर आहे. 


लखनौ आणि चेन्नई आमने सामने येणार ?


लखनौ सुपर जाएंटस आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमने सामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्सवर चेन्नई सुपर किंग्जनं 20 धावांनी विजय मिळवला होता. महेंद्रसिंह धोनीनं चार बॉलमध्ये तीन षटकारांसह 20 धावांची खेळी केली होती. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध लढणार आहे.


लखनौ सुपर जाएंटसला दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सलग दोन मॅचमधील पराभवानंतर लखनौ सुपर जाएंटस विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत. लखनौ सुपर जाएंटसचा चेन्नई सुपर किंग्जपुढं निभाव लागणार का हे पाहावं लागणार आहे.  


दुसरीकडे ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जला सहापैकी चार मॅचमध्ये विजय मिळाला आहे.चेन्नईला दोन पराभवांचा सामना देखील करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आठ  गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या : 


Hardik Pandya : ... तर तुम्ही चाहत्यांची मनं जिंकाल, हार्दिक पांड्याला भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा कानमंत्र


IPL 2024 : आयपीएलमध्ये 17 वर्षात एकाही भारतीयाला जे जमलं नाही ते करुन दाखवलं, आशुतोष शर्मानं इतिहास रचला