Matheesha Pathirana चेन्नई : भारतीय क्रिकेट टीम आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून खेळतोय. एमएस धोनीच्या बॅटिंगची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.धोनी चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएल खेळणाऱ्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसून येतो. युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी धोनी प्रयत्न करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानानं (Matheesha Pathirana) धोनीबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. एका व्हिडीओ मुलाखतीत त्यानं जी भूमिका माझे वडील बजावतात ती भूमिका क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी माझ्यासाठी बजावतो, असं म्हटलं. 
  
धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या युवा वेगवान गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय. धोनीनं त्याला अनेकदा टिप्स देखील दिल्या आहेत. श्रीलंकेचा युवा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळतोय. चेन्नई सुपर किंग्जच्या त्या खेळाडूचं नाव मथिशा पथिराना असं आहे. मथिशा पथिरानानं एका मुलाखतीत म्हटलं की क्रिकेटमध्ये धोनी त्याच्या वडिलांप्रमाणं भूमिका बजावतोय. पथिरानानं असं वक्तव्य करुन भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.  


लायन्स अपक्लोजच्या व्हिडीओत मथिशा पथिरानानं म्हटलं की, क्रिकेटच्या मैदानावर माझ्या वडिलांनंतर महत्त्वाची भूमिका धोनी सर बजावतात.  ते माझी काळजी घेतात, सल्ले देतात. जसे वडील घरी असताना करतात तसं, असं मथिशा पथिरानानं म्हटलं.


धोनीनं पुढच्या वेळी चेन्नईकडून खेळावं : मथिशा पथिराना 


मथिशा पथिराना पुढे म्हणाला की, धोनी सर जादा बोलत नाहीत मात्र ते नेहमी म्हणतात की खेळाचा आनंद घ्या आणि फिट रहा. मैदानावर ते काही खास बोलत नाहीत, मैदानाबाहेर ते छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. त्यामुळं माझ्यावर परिणाम होतो, मला त्यांच्याशी बोलल्यानंतर आत्मविश्वास मिळतो, असं  पथिराना म्हणाला.  


पथिराना पुढे म्हणाला की क्रिकेट सोडून आमच्यामध्ये जादा चर्चा होत नाहीत. मात्र, मला काही विचारायचं असल्यास मी थेट त्यांच्याकडे जातो. धोनी नेहमी सांगतात की तुम्ही तुमच्या खेळाचा आनंद घ्या, शरीराची काळजी घ्या, असं पथिराना म्हणाला.  


महेंद्रसिंह धोनी यांनी आयपीएलच्या आणखी एका हंगामात सहभागी व्हायचा निर्णय घेतल्यास त्यांनी चेन्नईकडून खेळावं, असं पथिराना म्हणाला. 


मथिशा पथिरानानं आयपीएलमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यावर्षी त्यानं केवळ दोन मॅच खेळल्या होत्या. पथिरानानं त्यावर्षी दोन मॅचमध्ये 52 धावा देत दोन विकेट गमावल्या होत्या. आयपीएलच्या 2023 च्या पर्वात तो पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप टेन बॉलर्समध्ये होता. आयपीएलच्या 2023 च्या हंगामात त्यानं 12 मॅच खेळल्या होत्या, त्यात 371 धावा देत 19 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत पथिराना सहाव्या स्थानावर आहे. त्यानं 13 विकेट घेतल्या आहेत. 


संबंधित बातम्या :


Hardik Pandya : गुजरातसाठी हिरो, मुंबईसाठी झिरो, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये फेल, यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर  


Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं फलंदाजांवर कारवाई करावी, आठव्या पराभवानंतर सेहवाग भडकला