Hardik Pandya In IPL 2024 मुंबई : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या 16 हंगामामध्ये 5  वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. मुंबई इंडियन्सनं 2020 मध्ये शेवटचं आयपीएलमधील (IPL 2024) विजेतेपद मिळवलं होतं. मात्र, त्यानंतर मुंबई इंडियन्सची सलग तीन वर्ष कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सला(Gujarat TItans) पहिल्याच हंगामात विजय आणि दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) रोहित शर्माऐवजी नेतृत्त्वाची जबाबदारी दिली. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या मॅनेजमेंटनं ट्रेड करुन हार्दिक पांड्याला गुजरातमधून मुंबईत आणलं होतं. त्यानंतर मुंबईचा कॅप्टन म्हणून हार्दिकच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्ससाठी तिच मोठी चूक मानली जात आहे. मुंबईच्या मॅनेजमेंटनं ज्या अपेक्षेनं हार्दिकला संघाचं कॅप्टन केलं होतं ते सत्यात उतरत नसल्याचं चित्र आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबईच्या टीमची कामगिरी खराब झाली आहे. मुंबईनं आतापर्यंत खेळलेल्या 11 मॅचपैकी 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईसाठी प्ले ऑफची दारं देखील दारं बंद झाल्याचं चित्र आहे. 


हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्ससाठी कॅप्टन आणि खेळाडू म्हणून देखील अयशस्वी ठरलाय. हार्दिकला बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबईत येण्यापूर्वी हार्दिकनं गुजरातचं दोन हंगामात नेतृत्त्व केलं होतं. हार्दिक पांड्यानं गुजरातचं नेतृत्त्व करातना पहिल्याच हंगामात त्यांना विजेतेपद मिळवून दिलं होतं.  याशिवाय हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्स 2023 च्या आयपीएलमध्ये उपविजेती ठरली होती. 


हार्दिक पांड्या गुजरातसाठी हिरो मुंबईसाठी झिरो


हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सनं लीग स्टेजमध्ये दोन हंगामात केवळ 7 सामन्यात पराभव स्वीकारला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळताना लीग स्टेजमध्ये एकाच हंगामात हार्दिकच्या नेतृत्त्वातील टीमनं 8 पराभव स्वीकारले आहेत. मुंबई इंडियन्सच्या अजून तीन मॅचेस बाकी आहेत. आकडेवारीचा विचार केला असता हार्दिक गुजरातसाठी हिरो तर मुंबईसाठी झिरो ठरलाय, असं म्हटलं जाऊ शकतं.  


आयपीएल 2024  मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी


आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये  अयशस्वी ठरलाय. त्यानं 11 मॅचमध्ये 19.80 च्या सरासरीनं  आणि 147.76 च्या स्ट्राइक रेटनं 198 धावा केल्या आहेत. हार्दिकची यंदाची सर्वाधिक धावसंख्या 46 इतकी राहिली आहे. हार्दिकनं त्याच्या बॉलिंगच्या जोरावर 8 विकेट घेतल्या असून 11 च्या इकॉनमीनं धावा दिल्या आहेत.


संबंधित बातम्या :


Mumbai Indians : मुंबईच्या बॅटिंग कोच, बॉलिंग कोच अन् कॅप्टनची चूक, मॅनेजमेंटनं त्यांना जाब विचारावा : विरेंद्र सेहवाग


IPL 2024 Hardik Pandya: 'मुंबई इंडियन्स जिंकू दे अथवा हरु दे...'; भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केलं हार्दिक पांड्याचं कौतुक