IPL Records : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. 2008 पासून सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेने जगभरातील क्रिकेटचं रुपडं बदललं. आयपीएलमध्ये अनेकांनी शानदार कामगिरी केली. आयपीएलचे सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने 250 आयपीएल सामने खेळले आहेत. आयपीएलचे 200 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. आतापर्यंत फक्त 9 खेळाडूंनाच 200 सामन्यांचा टप्पा पार करता आला आहे. त्यामध्ये एकाही विदेशी खेळाडूचा समावेश नाही. सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी पाहूयात...


1. एम एस धोनी


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूमध्ये एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनी 2008 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. त्यानं आयपीएल 2023 पर्यंत 205 सामने खेळले आहेत. धोनी वगळता एकाही फलंदाजाला 250 चा पल्ला पार करता आला नाही. 


2. रोहित शर्मा - 


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यामध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 243 सामने खेळले आहेत. 


3. दिनेश कार्तिक 


दिनेश कार्तिक यानं आयपीएलमध्ये 242 सामने खेळले आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर येतो. 


4. विराट कोहली - 


रनमशीन विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 237 सामने खेळले आहेत. विराट कोहली पहिल्यापासूनच आरसीबी संघाचा सदस्य आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. 


5. रवींद्र जाडेजा - 


अष्टपैलू रवींद्र जाडेजा सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. रवींद्र जाडेजाने 226 आयपीएलमध्ये सामने खेळले आहेत. जाडेजाने सर्वाधिक सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. 


6. शिखर धवन - 


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे. शिखर धवन यानं 217 आयपीएल सामने खेळले आहेत. 


7. रॉबिन उथप्पा - 


या यादीत रॉबिन उथप्पा सातव्या क्रमांकावर आहे. रॉबिन उथप्पानं आयपीएलचे 205 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमधून निवृत्त झालाय. 


8. सुरेश रैना - 


मिस्टर आयपीएल सुरेश रैना यानं आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. सुरेश रैना निवृत्त झालाय. त्यानं चेन्नईसाठी आपले सर्वाधिक आयपीएल सामने खेळलेत.


9. अंबाती रायडू - 


अंबाती रायडू दहाव्या क्रमांकावर आहे. अंबाती रायडूने आयपीएलचे 204 सामने खेळले आहेत. अंबाती रायडू निवृत्त झालाय. या 9 खेळाडूंशिवाय एकाही खेळाडूला अद्याप 200 सामन्याचा पल्ला पार करता आला नाही. विशेष म्हणजे, या यादीत एकाही विदेशी खेळाडूचा समावेश नाही.


आणखी वाचा :  


किंग पहिला, हिटमॅन चौथा, धोनीचा क्रमांक कितवा? IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज 


IPL ची पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली, सर्वाधिक हॅट्ट्रिक कुणाच्या नावावर ?


Pakistani Cricketer in IPL:  आफ्रीदी,  अख्तर, मलिक... 'हे' 11 पाकिस्तानी क्रिकेटर्स खेळलेत IPL


IPL मध्ये 22 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी


कोहली-गंभीर, स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खान बॅन, IPL मधील मोठे वाद


IPL 2024 : आले किती गेले किती... IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!



IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज


रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!


तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!


Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!


IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार