IPL Auction 2025 Mohammed Siraj : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने 12.75 कोटी रुपयांना विकत घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या जुन्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने RTM वापरला नाही. आरसीबीने सिराजला सोडले होते. पण आरसीबी सिराजला आरटीएमखाली घेईल, असा विश्वास होता.
सिराज गेल्या हंगामापर्यंत आरसीबी संघाचा भाग होता. मात्र, फ्रँचायझीने त्याला लिलावापूर्वी सोडले. आता सिराज नव्या टीममध्ये दिसणार आहे. सिराजला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. गुजरातने सिराजला 12.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हैदराबादने मोहम्मद शमीला 10 कोटींना घेतले विकत
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या वर्षी सर्वात महागडा ठरलेल्या मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. आता सिराजचीही 10 कोटींहून अधिक किंमतीला विक्री झाली आहे. या सर्व स्टार वेगवान गोलंदाजांना 15 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यात आले आहे. सिराज हा आतापर्यंतचा सर्वात महागडा वेगवान गोलंदाज आहे. त्याला शमी, स्टार्क आणि रबाडा यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.
आयपीएल 2025 मेगा लिलावात पंजाब किंग्जने आतापर्यंत 3 खेळाडूंना खरेदी केले आहे. अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहल अशी त्यांची नावे आहेत. पंजाबने या 3 खेळाडूंवर 62.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. पंजाबच्या पर्समध्ये अजूनही 47.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. लिलावापूर्वी पंजाबने शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांना आधीच कायम ठेवले आहे. पंजाब संघात श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्या रूपाने तीन हाय-प्रोफाइल खेळाडूंचे आगमन हे आगामी हंगामातील अव्वल संघ बनवेल.
मार्की खेळाडूंचा सेट पूर्ण मार्की मेगा लिलावासाठी 12 खेळाडूंचा सेट तयार करण्यात आला होता, ज्यांना मार्की खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. या 12 पैकी गुजरात आणि पंजाबने 3-3, तर दिल्ली आणि लखनऊने 2-2 खेळाडू विकत घेतले. याशिवाय हैदराबाद आणि बंगळुरूने प्रत्येकी 1 खेळाडू विकत घेतला आहे.
मार्की खेळाडूंचा सेट पूर्ण
मार्की मेगा लिलावासाठी 12 खेळाडूंचा सेट तयार करण्यात आला होता, ज्यांना मार्की खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. या 12 पैकी गुजरात आणि पंजाबने 3-3, तर दिल्ली आणि लखनऊने 2-2 खेळाडू विकत घेतले. याशिवाय हैदराबाद आणि बंगळुरूने प्रत्येकी 1 खेळाडू विकत घेतला आहे.