IPL 2025 Auction दुबई : भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) याने आयपीएल 2025 च्या लिलावात नवा इतिहास रचला आहे. अर्शदीप सिंगने आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह मार्की खेळाडू म्हणून लिलावात प्रवेश केला होता. पंजाब किंग्जने आरटीएम कार्डचा वापर करून अर्शदीपला 9 पट किमतीत त्यांच्या संघात समाविष्ट केले. लिलावापूर्वी अर्शदीपला पंजाब किंग्जने सोडले होते.
पंजाब किंग्सने राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती आणि त्याला मिळवण्यासाठी CSK आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही काळ सामना रंगला होता. नंतर राजस्थान आणि गुजरातनेही उडी घेतली, पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने 15.75 कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याचा वापर केला. पंजाबने अर्शदीपमध्ये रस दाखवला. यानंतर हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने होकार दिला.
दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने या गोलंदाजाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. रबाडा यापूर्वी पंजाबकडून खेळला होता, पण पंजाबने रबाडासाठी आरटीएमचा वापर केला नाही.
जोस बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती आणि त्याच्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सही शर्यतीत सामील झाले आणि त्यांची गुजरातशी टक्कर पाहिली. अखेर गुजरातने बटलरला 15.75 कोटींना विकत घेतले. बटलरला राजस्थान रॉयल्सने सोडले.
मिशेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सनं 11.75 कोटी रुपये मोजत संघात घेतलं. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर आयपीएल ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांचा खर्च करुन संघात घेतलं. श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्जचं कर्णधारपद जाऊ शकतं.