Mumbai Indians vs UP Warriorz Women : महिला प्रीमियर लीग 2023 (Women's National League) चा 15 वा सामना आज रविवारी 18 मार्च रोजी खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्सच्या (UP Warriorz) महिला संघांमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग पाच सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये (WPL Playoffs) पोहोचलेला मुंबई इंडियन्सला संघ यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. महिला प्रीमियर लीगमध्ये एलिसा हिली यूपी वॉरियर्स संघाची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. यूपी संघाने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात आज रंगणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता, जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स-यूपी वॉरियर्स या महिला संघांमधील सामना कधी होणार?
18 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये सामना रंगणार आहे.
मुंबई इंडियन्स-यूपी वॉरियर्स महिला संघाचा सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स महिला संघांमधील सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्स-यूपी वॉरियर्स सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 3 वाजता नाणेफेक होईल.
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठं पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमा अॅपचे मेंबरशिप घेतलेले युजर्स ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे त्यांच्या मोबाइल फोनवर सामना पाहू शकतात. त्याचबरोबर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://www.marathi.abplive.com//amp वरही उपलब्ध असतील.
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचा महिला संघ
मुंबई इंडियन्स महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियांका बाला, यास्तिका भाटिया, नीलम बिश्त, हीदर ग्रॅहम, धारा गुजर, सायका इशाक, जिंतिमनी कलिता, अमनजोत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रंट, , पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, सोनम यादव.
यूपी वॉरियर्स महिला संघ : अलिसा हिली (कर्णधार), अंजली सरवानी, लॉरेन बेल, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस, शबनीम इस्माईल, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, शिवाली शेख, शिमना शेख देविका वैद्य, सोप्पधंडी यशश्री.
महत्त्वाच्या इतर बातम्या :