Royal Challengers Bengaluru Beat Punjab Kings: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bengaluru) दारुण पराभव केला. ट्रॉफी तर बंगळुरू घेऊन गेली, पण पंजाबला काही रिकाम्या हातानं जावं लागलं नाही. पंजाबची मालकीण प्रीति झिंटा हिला नुकसान नाहीतर, तब्बल 10 पट फायदा झाल्याची माहिती मिळत आहे. प्रीति झिंटानं 35 कोटी रुपयांच्या 10 पट म्हणजेच, 350 कोटी रुपये कमावले आहेत. तुम्हाला हे ऐकूण धक्का बसला असेलच. कारण टीम हरली म्हणून मुसूमुसू रडणाऱ्या प्रीति झिंटाला नेटकऱ्यांनी सहानुभूती दिली होती. पण, संघ हरुनही तब्बल 350 कोटींची कमाई प्रीति झिंटानं नेमकी केली कशी? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement


2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा प्रीति झिंटानं 35 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन पंजाब किंग्ज इलेव्हनमध्ये 32 टक्के हिस्सा घेतला होता. पण आता प्रीती झिंटाचा हा हिस्सा 10 पट जास्त म्हणजेच, 350 कोटी रुपये झाला आहे.


10 पटींनी वाढली प्रीति झिंटाची भागीदारी


टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, पंजाब किंग्स इलेवन टीमची 2022 मध्ये एकूण वॅल्यू 925 मिलियन डॉलर होती. यानुसार, जर प्रीति झिंटाची 23 टक्के भागीदारी वेगळी केली तर, त्यानुसार तिची 350 कोटी रुपयांची कमाई होते. 


बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणाऱ्या प्रीती झिंटाची एकूण संपत्ती सुमारे 533 कोटी रुपये आहे आणि तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती 2 कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारते, तर तिनं रिअल इस्टेटमध्येही भरपूर पैसे गुंतवले आहेत.


2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रीती झिंटा यांचा मुंबईतील पाली हिल येथे 17 कोटींचा फ्लॅट आहे. शिमला इथे तिचं कोट्यवधींचं घर आहे. याशिवाय मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यूसह अनेक लग्झरी कार देखील तिच्याकडे आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, प्रीति झिंटा यांचं अमेरिकेतील बेव्हरली हिल्समध्ये एक घर आहे, जिथे ती तिच्या दोन मुलांसह आणि पतीसह राहते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2025: पन्नाशीची असूनही 25 वर्षांच्या तरुणीला लाजवणारं प्रीति झिंटाचं लाघवी सौंदर्य; PBKS च्या मालकीणीचं ब्युटी सीक्रेट माहितीय?