MI Vs SRH LIVE Score Updates, IPL 2024 : मुंबई इंडियन्स अन् सनरायजर्स हैदराबाद आमने सामने, विजयाचं खातं कोण उघडणार?
Mumbai Indians Vs Sun Risers Hyderabad LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील आठवी मॅच मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झालेला.
मुंबईचा 31 धावांनी पराभव.. हैदराबादने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 246 धावांपर्यंत मजल मारली
हार्दिक पांड्याच्या रुपाने मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. मुंबईला 2 षटकात 54 धावांची गरज
पॅट कमिन्सने मुंबईला दिला चौथा धक्का... सेट झालेल्या तिलक वर्माला केले बाद.. तिलक वर्मा 64 धावांवर बाद
150 धावसंख्येवर मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. नमन धीर 30 धावांवर बाद झाला आहे.
278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने जोरदार पलटवार दिला. मुंबईने 10 षटकांमध्ये 150 धावांपर्यंत मजल मारली आहे.
हैदराबादची 277 धावांपर्यंत मजल.. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
मुंबईविरोधात क्लासेन यानं अर्धशतक ठोकलेय. हैदराबाद 250 पार
16 व्या षटकात हैदराबादने 200 धावांचा पल्ला पार केला आहे. हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे.
हैदराबादने 11 षटकात 3 बाद 167 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा 23 चेंडूमध्ये 63 धावा काढून बाद झाला.
अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले
आयपीएलच्या 17 व्या हंगामात ट्रेविस हेडने शानदार फलंदाजी केली. त्याने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 18 चेंडूत अर्धशतक ठोकले
ट्रेविस हेड, मयांक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयांक मार्केंडे, जयदेव उनादकट
इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोएत्जे, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, केविन माफाका
आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. गुजरातने मुंबईचा पराभव केला होता. तर हैदराबादला कोलकात्याने पराभूत केले होते. मुंबई आणि हैदराबादला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरतील. आज कोणता संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय, हे लवकरच समजेल.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
थोड्याच वेळात नाणेफेक होणार.. हार्दिक पांड्या आणि पॅट कमिन्स मैदानात उतरलाय..
मुंबई इंडियन्स आज आयपीएलमधील दुसरा सामना खेळणार आहे. आजच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव दुखापतीतून बरा न झाल्यानं उपलब्ध नसेल. मुंबईपुढं सूर्यकुमार यादवची उणीव भरुन काढण्याचं आव्हान आहे.
विराट कोहली गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा क्रिकेटपटू
हैदराबाद आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. हैदराबादमध्ये पावसाची शक्यता नसल्यानं मॅचमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. हैदराबादमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या हेन्रिच क्लासेनवर सनरायजर्स हैदराबादची मदार आहे.
शुभमन गिलला स्लो ओव्हर्स रेटमुळं 12 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील मॅचसाठी हा दंड आकारण्यात आला.
आयपीएलमध्ये यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद 20 वेळा आमने सामने आले होते. 12 मॅच मुंबई इंडियन्स आणि 9 मॅच हैदराबादनं जिंकल्या होत्या. 2020 च्या आयपीएलपासून मुंबईनं 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत.
जसप्रीत बुमराहला आजच्या मॅचमध्ये आयपीएलमध्ये 150 विकेट घेण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या लढतीचं वेळापत्रक
सनरायजर्स हैदराबादला विजयाचा सूर आजच्या मॅचमध्ये तरी गवसणार का हे पाहावं लागणार आहे. आज सनरायजर्स हैदराबादची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.
मुंबई इंडियन्सनला 2024 च्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पार्श्वभूमी
Mumbai Indians Vs Sun Risers Hyderabad LIVE: आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांची सुरुवात सारखीच झाली आहे. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स विरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर, सनरायजर्स हैदराबादला कोलकाता विरुद्ध 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांचं नेतृत्त्व नवे कप्तान करत आहेत. मुंबईचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे तर सन रायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व पॅट कमिन्सकडे आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -