Mumbai Indians vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा विजय; मुंबई इंडियन्सवर केली मात

Mumbai Indians vs Rajasthan Royals: भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.

मुकेश चव्हाण Last Updated: 01 Apr 2024 11:08 PM
राजस्थानचा विजय

राजस्थानचा मुंबईवर सहा विकेटने विजय

राजस्थानचे तीन फलंदाज तंबूत

मुंबईने दिलेल्या 126 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने अश्वासक सुरुवात केली आहे. राजस्थानने 3 विकेटच्या मोबदल्यात 50 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जायस्वाल तंबूत परतले आहेत. तर जोश बटलर एकाकी किल्ला लढवत आहे. सध्या सामन्यावर राजस्थानचं वर्चस्व दिसत आहे. 

राजस्थानला पहिला धक्का

यशस्वी जायस्वाल 10 धावा काढून तंबूत परतला. मुंबईकडून जोरदार सुरुवात

मुंबईची 125 धावांपर्यंत मजल

मुंबईची 125 धावांपर्यंत मजल

मुंबईला आठवा धक्का

गेराल्ड कोएत्जेच्या रुपाने मुंबईला आठवा धक्का बसला आहे. 

मुंबईला सातवा धक्का

तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला सातवा धक्का बसला आहे.  चहलने तिलक वर्माला पाठवलं तंबूत.. 

मुंबईचे सहा फलंदाज तंबूत

हार्दिक पांड्या आणि पियूष चावला बाद झाले. मुंबईचा सहा फलंदाज तंबूत परतले. तिलक वर्माची एकाकी झुंज सुरु आहे. मुंबईने 6 बाद 94 धावा

तिलक वर्मा - हार्दिक पांड्याने डाव सावरला

तिलक वर्मा - हार्दिक पांड्याने डाव सावरला... 4 बाद 20 अशी दैयनीय अवस्था मुंबईची झाली होती. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरला. 6.5 षटकांमध्ये मुंबई 4 बाद 54 धावा

मुंबईला चौथा धक्का

ईशान किशनच्या रुपाने मुंबईला चौथा धक्का बसला आहे. 

मुंबईला तिसरा धक्का

डेवॉल्ड ब्रेविस शून्यावर बाद... मुंबईला तिसरा धक्का, ट्रेंट बोल्टचा भेदक मारा

मुंबईला लागोपाठ दुसरा धक्का

ट्रेंट बोल्टने मुंबईला लागोपाठ दोन धक्के दिले. रोहित शर्मानंतर नमन धीरही तंबूत परतला. मुंबईची खराब सुरुवात एका धावेवर दोन विकेट...  ट्रेंट बोल्टचा भेदक मारा... 

मुंबईला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा शून्यावर तंबूत परतला आहे. ट्रेंट बोल्टने पाठवलं तंबूत

राजस्थानने नाणेफेक जिंकली

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार

आज कोणाला बनवाल तुमच्या टीमचा कर्णधार, पाहा 11 खेळाडूंची टीम

राजस्थान की मुंबई...कोण पुढे?

आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 28 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबईने 15 वेळा, तर राजस्थानने 13 वेळा विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा वरचष्मा दिसत आहे. या हंगामातील दोघांमध्ये पहिला सामना होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


 


 

गणपती बाप्पा मोरया...; राजस्थानकडून ट्विट

नवज्योतसिंह सिद्धू यांनी रोहित शर्माचा व्हिडिओ केला पोस्ट

राजस्थान रॉयल्सची Probable XI:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्सची Probable XI: 

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.


 

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, केशव महाराज , टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर





मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ:

रोहित शर्मा, इशान किशन (W), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस

आकडे काय सांगतात?

वानखेडे मैदानावर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 109 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 59 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच धावांचा पाठलाग करणे हा या मैदानावर फायदेशीर असल्याचे दिसते.

वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?

आयपीएल 2024 मधील 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. वानखेडेवर फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी असते. या मैदानावर धावांवर नियंत्रण ठेवणे गोलंदाजांसाठी खूप अवघड काम असते. वेगवान आउटफिल्डमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवणे सोपे फलंदाजांसाठी राहते.

दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान

आर अश्विन आणि रोहित शर्माची वानखेडे मैदानावर भेट

पार्श्वभूमी

MI vs RR IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.