IPL 2023 MI vs RR, Match 42 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स (MI vs RR) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात विजय मिळवला. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्सने विजय मिळवला. यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गडी गमावून 212 धावा केल्या. जैस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 124 धावांची खेळी केली. त्याचबरोबर या मोसमात तिसऱ्यांदा मुंबईविरुद्ध एका संघाने 200 हून अधिक धावा केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. टीम डेव्हिड शेवटच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही संघाने 200 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पार केलं आहे. 


वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी


वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सने नवा इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडिअम 200 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश मिळवणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच एका संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना यश मिळालं आहे.


आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना


इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. मुंबईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवून या सामना अविस्मरणीय ठरवला आहे. वानखेडेवर 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबई संघाने यशस्वीरित्या केला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रविवारी (20 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मुंबई संघाने केला.


मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय


सुर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि टीम डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 212 धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडूत आणि सहा विकेट राखून यशस्वी पार केले. राजस्थानचा पराभव करत मुंबईने रोहित शर्मा याला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादव याने 55 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने अखेरीस 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sandeep Sharma IPL : 19 मीटरचं अंतर उलट दिशेनं धावत संदीप शर्माची अफलातून कॅच, पाहून तुम्हीही व्हाल फॅन; व्हायरल Video एकदा पाहाच