IPL 2023, MI vs RR, Match 42 : आयपीएल 2023 मध्ये 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने मुंबईला 20 षटकात 212 धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात मुंबई संघाने 19.3 षटकात 214 धावांचा डोंगर रचला आणि सामना सहा विकेटने जिंकला. या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला असला तरी संघासाठी दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचं प्रचंड कौतुक होत आहे. यशस्वी जैस्वालनं 62 चेंडून 124 धावांची स्फोटक फलंदाजी केली. यासोबतच आणखी एका खेळाडून साऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यानं दमदार फलंदाज सुर्यकुमार यादवला झेलबाद केलं. इतकंच नाही तर या सामन्यात दुसऱ्या षटकात त्यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही बोल्ड केलं.


'सुपरमॅन' संदीप शर्मा! सूर्यकुमारसाठी ठरला कर्दनकाळ


मुंबई संघाकडून सुर्यकुमार यादव दमदार फलंदाजी करताना दिसत होता. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या झेलबाद झाला. राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं सुर्यकुमार यादवला शानदार डायव्हिंग झेल घेत, त्याला तंबूत माघारी धाडलं. त्यानं झेल घेण्यासाठी 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत जात डॅशिंग झेल घेतला. सुर्यकुमार यादवचा झेल घेणाऱ्या संदीप शर्माचं सर्वत्र कौतुक होतं आहे. या दमदार कॅचचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






शानदार कॅच घेत सुर्यकुमारला धाडलं माघारी


सोळाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने चेंडू टाकला. सूर्यकुमार यादवने मारलेला चेंडू शॉर्ट फाईन लेगकडे गेला. 30 यार्डच्या वर्तुळात उभा असलेला संदीप शर्मा मागच्या बाजूला धावत गेला आणि डायव्हिंग करत उत्तम झेल घेतला. यासोबतच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने याला त्याच्या  वाढदिवसा दिवशी (30 एप्रिल) बोल्ड करत केवळ 3 धावांवर तंबूत पाठवलं.


पाहा व्हिडीओ : 






Who is Sandeep Sharma : कोण आहे संदीप शर्मा?


संदीप शर्मा मूळचा पंजाबचा खेळाडू आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पटियाला येथे बलविंदर शर्मा आणि नैना वटी यांच्या येथे झाला होता. संदीप शर्मा याला सुरुवातीला फलंदाज व्हायचे होते.. पण कोचने त्यांना गोलंदाज होण्याचा सल्ला दिला.. संदीप शर्मा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. 


टीम इंडियाचाही भाग


संदीप शर्मा अंडर 19 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा भाग होता. संदीप शर्माच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाने 2012 मध्ये अंडर 19 चा वर्ल्ड कप जिंकला होता. संदीप शर्मा याने सिनिअर टीम इंडियाकडूनही दोन सामने खेळले आहेत. 2015 मध्ये झिम्बॉम्बेविरोधात तो भारतीय संघाचा भाग होता. या दोन सामन्यात संदीपला भेदक मारा करता आला नव्हता. त्याला दोन सामन्यात फक्त दोन विकेट घेता आल्या होत्या. त्यानंतर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs RR, IPL 2023 : मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी, वानखेडे स्टेडिअमवर रचला नवा विक्रम