IPL 2023 Orange Cap and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) मजल मारली आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्या पराभव झाला असला, तरी यशस्वीच्या 124 धावांच्या खेळीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं. या खेळीसोबतच यशस्वी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. सध्या ऑरेंज कॅप यशस्वीकडे असून त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 428 धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा फलंदाज फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) आहे. डु प्लेसिसने यंदाच्या हंगामात आठ सामन्यांमध्ये 422 धावा केल्या आहेत.
यामागोमाग चेन्नई सुपर किंग्सचे दोन फलंदाज तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या डेवॉन कॉनवेनं (Dewon Conway) पंजाब विरुद्धच्या सामन्यात 92 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यानंतर तो ऑरेंज कॅपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 414 धावा केल्या आहेत. पंजाबविरोधात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 37 धावांची खेळी केली. यानंतर ऋतुराज चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 354 धावा केल्या आहेत.
ऑरेंज कॅपच्या यादीत पाचव्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) हे दोन खेळाडू आहेत. दोघांनीही यंदाच्या हंगामात आठ सामन्यात 333 धावा केल्या आहेत.
IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप
क्र. | टॉप 5 फलंदाज | धावा |
1. | यशस्वी जैस्वाल | 428 |
2. | फाफ डु प्लेसिस | 422 |
3. | डेवॉन कॉनवे | 414 |
4. | ऋतुराज गायकवाड | 354 |
5. | विराट कोहली | 333 |
5. | शुभमन गिल | 333 |
IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा तुषार देशपांडे याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. नऊ सामन्यांमध्ये 17 विकेट घेणारा तुषार सध्या पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्यानंतर पंजाबचा अर्शदीप सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने नऊ सामन्यांत 15 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा फलंदाज मोहम्मद सिराज आणि त्यानंतर राशिद खान आहे. दोघांनीही आठ सामन्यांमध्ये प्रत्येकी 14-14 विकेट घेतल्या आहेत.
क्र. | टॉप 5 गोलंदाज | विकेट |
1. | तुषार देशपांडे | 17 |
2. | अर्शदीप सिंह | 15 |
3. | मोहम्मद सिराज | 14 |
4. | राशिद खान | 14 |
5. | मोहम्मद शमी | 13 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :