MI Vs RCB LIVE Score Updates, IPL 2024: मुंबई इंडियन्सचा विराट विजय, आरसीबीचा पाचवा पराभव

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru LIVE Score Updates, IPL 2024 :मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत.

युवराज जाधव Last Updated: 11 Apr 2024 11:19 PM
मुंबईचा दुसरा विजय, आरसीबीला पराभवाचा धक्का

मुंबई इंडियन्सनं 7 विकेटनं विजय मिळवला आहे. मुंबईकडून ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहजपणे आरसीबीला पराभूत केलं. 

मुंबईला तिसरा धक्का सूर्यकुमार यादव 52 धावा करुन बाद

मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 52 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवनं दुखापतीनंतर कमबॅक करताना दुसऱ्याच मॅचमध्ये फटकेबाजी केली आहे. सूर्यकुमार यादवनं अर्धशतक केलं. 

मुंबईच्या 150 धावा पूर्ण, रोहित शर्मा बाद

मुंबईला दुसरा धक्का बसला असून रोहित शर्मानं 38 धावा केल्या. दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं केलेल्या फटकेबाजीमुळं मुंबईनं 13 व्या ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पा पार केला. 

मुंबईला पहिला धक्का, ईशान किशन 69 धावांवर बाद

मुंबईला आक्रमक सुरुवात करुन देणारा ईशान किशन 69 धावांवर बाद झाला आहे. 

मुंबईच्या 100 धावा, ईशान किशन आणि रोहितची शतकी भागिदारी

मुंबई इंडियन्सनं आक्रमक सुरुवात केली असून नवव्या ओव्हरलाच 100 धावा पार केल्या आहेत. 

मुंबईची आक्रमक सुरुवात, पॉवरप्लेमध्ये इशान किशनचं अर्धशतक

मुंबई इंडियन्सनं 196  धावांचा पाठलाग करताना सहा ओव्हरमध्ये 72 धावा केल्या आहेत. 

कार्तिकची फटकेबाजी, 23 बॉलमध्ये 53 धावा, मुंबईपुढे आरसीबीचं किती धावांचं आव्हान?

दिनेश कार्तिकनं 23 धावात 53 धावा केल्यानं आरसीबीनं कमबॅक केलं. आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 196 धावा केल्या. 

आरसीबीला जसप्रीत बुमराहचे आणखी दोन धक्के

जसप्रीत बुमराहनं आरसीबीला आणखी दोन धक्के दिले आहेत. बुमराहनं आजच्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. सौरव चव्हाण आणि विजयकुमार व्यषकला बुमराहनं बाद केलं. 

आरसीबीला पाचवा धक्का, फाफ डु प्लेसिस 61 धावा करुन बाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पाचवा धक्का बसला आहे. फाफ डु प्लेसिस  61 धावा करुन बाद झाला आहे. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केलं. 

आरसीबीचा डाव दिनेश कार्तिक आणि डु प्लेसिसनं सावरला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिकनं सावरला आहे. आरसीबीनं 17 व्या ओव्हरला 150 धावांचा टप्पा पार केला आहे. 

बंगळुरुला तिसरा धक्का, रजत पाटीदार 50 धावांवर बाद

रजत पाटीदारनं अर्धशतक झळकावल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. त्यानं 50 धावा केल्या. 

रजत पाटीदार आणि फाफ डु प्लेसिसनं डाव सावरला

बंगळुरुचा डाव फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी सावरला आहे. पाटीदारनं अर्धशतक केलं. 

आरसीबीचा डाव कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं सावरला

आरसीबीचा डाव कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं सावरला आहे. 8 व्या ओव्हरपर्यंत त्यानं 35 धावा केल्या आहेत. 

आरसीबीला दुसरा धक्का, विली जॅक्स बाद

आरसीबीला दुसरा धक्का बसला असून विली जॅक्स बाद झाला आहे. विली जॅक्स 8 धावा करुन बाद झाला आहे. 

आरसीबीला पहिला धक्का,विराट कोहली बाद

विराट कोहली तीन धावा करुन बाद झाला आहे.  जसप्रीत बुमराहनं कोहलीला बाद केलं. 

हार्दिक पांड्यानं टॉस जिंकला, मुंबईचा बॉलिंगचा निर्णय

हार्दिक पांड्यानं टॉस जिंकला असून आरसीबी विरुद्ध मुंबईनं बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.  

दोन्ही संघांचा एका मॅचमध्ये विजय

गुणतालिकेत दोन्ही संघांकडे दोन गुण आहेत. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं तर आरसीबीनं पंजाब किंग्जला पराभूत केलं आहे.

मुंबई इंडियन्सचं वानखेडे स्टेडियमवर वर्चस्व

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात वानखेडे स्टेडियमवर 10 मॅच झालेल्या आहेत. यापैकी सात मॅचमध्ये मुंबईचा विजय झालेला आहे. तर दुसरीकडे आरसीबीला केवळ तीन वेळा विजय मिळाला आहे. 

मुंबई इंडियन्समध्ये हार्विक देसाईची एंट्री

मुंबईचा क्रिकेटर विष्णू विनोद जखमी झाल्यानं त्याच्या जागी हार्विक देसाईला संघात संधी देण्यात आली आहे. 

पार्श्वभूमी

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru LIVE Score Updates, IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणार आहेत. दोन्ही संघांना आतापर्यंत एका मॅचमध्ये विजय मिळाला आहे. आज दोन्ही संघ दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.