MI vs KKR, IPL 2023 : ईशान किशानचे अर्धशतक आणि सूर्या-टीम डेविडची छोटेखानी खेळीच्या बळावर मुंबईने कोलकात्याचा पाच विकेटने पराभव केला.  मुंबईचा यंदाच्या हंगमातील हा दुसरा विजय होय... ईशानच्या अर्धशतकापुढे वेंकटेश अय्यरची शतकी खेळी फिकी पडली. सूर्या आणि टीम डेविड यांनीही मोठे योगदान दिले. 


ईशान किशनचे अर्धशतक -
ईशान किशन याने वानखेडे मैदानावर पहिल्या चेंडूपासून धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन याने २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. ईशान किशन याने रोहित शर्मासोबत २९ चेंडूत ६५ धाांची सलामी दिली. 


सूर्या-तिलक-टीम डेविडची महत्वाची खेळी - 
ईशान किशन याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने २५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्याने  तीन षटकार आणि चार चौकार लगावले. तिलक वर्मा याने एक षटकार आणि तीन चौकारासह ३० धावांचे योगदान दिले. तर टीम डेविड याने २४ धावांची मॅच विनिंग खेळी केली.  रोहित शर्मा याने १३ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकाराचा सामावेश आहे.


कोलकात्याकडून सुयश शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्गुसन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.


दरम्यान, वेंकटेश अय्यर याच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकात्याने निर्धारित २० षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. रसेल याने अखेरच्या षटकात 11 चेंडूत 21 धावांचे योगदान दिल्यामुळे कोलकाता सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचू शकले.  


वेंकटेशचा शतकी धमाका - 
वानखेडेच्या मैदानावर वेंकटेश अय्यर याने  पहिल्या चेंडूपासूनच धावांचा पाऊस पाडला. वेंकटेश अय्यर याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला वेंकटेशने धावांचा पाऊस पाडला. वेकंटेशने आपल्या शतकी खेळीत नऊ षटकार आणि सहा चौकार लगावले. वेंकटेश अय्यरच्या शतकी खेळीला रायली मेरिडेथ याने संपुष्टात आणले. विशेष म्हणजे.. आयपीएलच्या सोळा वर्षात कोलकात्यासाठी हे फक्त दुरे शतक होय... २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रॅडन मॅक्युलम याने १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याकडून एकही शतक झळकावण्यात आले नव्हते. आज वेंकटेश अय्यर याने शतकी खेळी करत कोलकात्याचा शतकी दुष्काळ संपुष्टात आणला. 


इतर फलंदाजांची कामगिरी कशी - 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. नारायण जगदीशन खातेही न उघडता तंबूत परतला. कॅमरुन ग्रीन याने त्याचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर गुरबाजही आठ धावा काढून बाद झाला. एका बाजूला वेंकटेश अय्यर धावांचा पाऊस पाडत होता. पण दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या. कर्णधार नीतीश राणा पाच धावा काढून बाद झाला. शार्दुल ठाकूर १३, रिंकू सिंह १८ धावा काढून बाद झाले. 


मुंबईची गोलंदाजी कशी -


मुंबईच्या फिरकी गोलदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. पीयुष चावला याने चार षटकात १९ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर शौकिन याने चार षटकात दोन विकेट घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दसुन जानसेन, रायली मेरिडेथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  दसुन जानसेन महागडा ठरला.. त्याने चार षटकात ५३ धावा खर्च केल्या. अर्जुन तेंडुलकर याने दोन षटकात १७ धावा दिल्या. 


अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण - 


क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे आज आयपीएलमध्ये पदार्पण झालेय. अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियनसने आज पदर्पणाची संधी दिली. मागील दोन वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात होता. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. आझ मुंबईने अर्जुनला संधी दिली. मुंबईने अर्जुनला 25 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. 2021 आणि 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाचा भाग होता.. पण त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नव्हते. आज रोहित शर्माने अर्जुनला पदार्पणाची कॅप दिली. कोलकात्याविरोधातील सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची कॅप दिली. प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाल्यानंतर अर्जुनला आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज रोहित शर्मा प्लेईंग ११ चा भाग नाही.. सूर्यकुमार यादव मुंबईचे नेृतृत्व करत आहे.  सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सूर्याने पहिल्या षटकात अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या.दसऱ्या षटकात अर्जुनला तेरा धावा मारल्या.