Arjun Tendulkar IPL Debut : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे आज आयपीएलमध्ये पदार्पण झालेय. अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियनसने आज पदर्पणाची संधी दिली. मागील दोन वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात होता. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. आझ मुंबईने अर्जुनला संधी दिली. मुंबईने अर्जुनला 25 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. 2021 आणि 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाचा भाग होता.. पण त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नव्हते. आज रोहित शर्माने अर्जुनला पदार्पणाची कॅप दिली.


कोलकात्याविरोधातील सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची कॅप दिली. प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाल्यानंतर अर्जुनला आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज रोहित शर्मा प्लेईंग ११ चा भाग नाही.. सूर्यकुमार यादव मुंबईचे नेृतृत्व करत आहे.  सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सूर्याने पहिल्या षटकात अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या.दसऱ्या षटकात अर्जुनला तेरा धावा मारल्या. अर्जुनला प्लेईंग मध्ये स्थान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींनी मिम्स पोस्ट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरची चर्चा आहे. 


































अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. रणजी चषकात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. तो मागील काही वर्षांपासून मुंबईच्या संघासोबत आहे. त्याच्या खेळामध्ये मोठी सुधारणा झाल्याचे दिसतेय. गोलंदाजीसोबत तळाला तो मोठी फटकेबाजीही करतो. त्यामुळे आज अर्जुन मैदानावर  कशी कामगरी करतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.