GT vs MI Qualifier 2 : आयपीएल (IPL 2023) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील क्वालिफायर 2 सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यंदाच्या मोसमात गुणतालिकेत 14 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवून पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने 14 सामन्यांपैकी आठ सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
अंतिम सामन्यात कोण पोहोचणार?
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात आणि मुंबई यांच्यात तीन सामने खेळवण्यात आले आहेत. चालू हंगामात दोन वेळा हा संघ आमने-सामने आले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. आज, 26 मे रोजी पुन्हा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत मजल मारेल.
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव
पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्स संघाचं आव्हान होतं. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यातील 87 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे चेन्नई (CSK) संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. गुजरातने (GT) फलंदाजीत काही बदल केले, पण याचा त्यांना फायदा झाला नाही. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात संघ 20 षटकात केवळ 157 धावा करून सर्व बाद झाला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 15 धावांनी खेळ जिंकला.
मुंबईनं एलिमिनेटर सामन्यात लखनौला हरवलं
मुंबई इंडियन्स (MI) संघाने त्यांच्या मागील सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सचा सामना केला. मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी संघासाठी आशा कायम ठेवली. मुंबईने 20 षटकांत आठ गडी गमावून एकूण 182 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात उतरलेल्या लखनौला 16.3 षटकांत सर्वबाद 101 धावा करता आल्या आणि त्यांनी 81 धावांनी सामना गमावला. मुंबईसाठी आकाश मधवालने 3.3 षटकात पाच धावा देत पाच बळी घेतले आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
MI vs GT Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स :
आकाश मधवाल, रमणदीप सिंह, डेवाल्ड ब्रेविस, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद.
गुजरात टायटन्स इम्पॅक्ट प्लेअर्स :
शुभमन गिल, साई सुदर्शन, के.एस. भरत, शिवम मावी, आर.साई किशोर.