RCB Fans, Social Media : आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं आव्हानं संपलं आहे. आरसीबी संघाचं आयपीएल विजेते होण्याचं स्वप्न यंदाही धुळीस मिळालं आहे. असं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मागे टाकलं आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आणि पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी निराश आली. 


आयपीएलमधून बाहेर पडूनही RCB नंबर 1


आरसीबी संघ आयपीएलच्या 16 व्या हंगामातून बाहेर पडला आहे. पण या संघाने चेन्नई सुपर किंग्जला देखील एका बाबतीत पराभूत केलं आहे. आरसीबी संघानं प्रसिद्धीच्या बाबतीत चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससह सर्व आयपीएल फ्रेंचायझींना मागे टाकलं आहे. आशिया खंडात आरसीबीचा संघ सोशल मीडियावर पहिल्या क्रमांकावर आहे, इतकंच नाही तर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या बाबतीत आरसीबी संघ जगात फुटबॉल क्लब रिअल माद्रिदच्या मागे आहे.


सोशल मीडियावर RCB चं 'किंग'


संपूर्ण आशिया खंडात सोशल मीडियाचा 'किंग' रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ आहे. याबाबतीत आरसीबी संघ पहिल्या क्रमांकाचा क्रीडा संघ आहे. यावरून विराट कोहली आणि आरसीबी संघाचा चाहतावर्ग किती मोठा आहे हे दिसून येतं. माजी कर्णधार विराट कोहलीचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यती आधीच बाहेर पडला नाही. आरसीबीला एकदाही आयपीएल जिंकला आलेली नाही. असं असलं तरी, आरसीबी आणि विराट कोहलीची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही.


आयपीएलमधून बाहेर पडूनही चेन्नई सुपर किंग्सला टाकलं मागे


एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर एंगेजमेंट डेटा समोर आला आहे. यामध्ये जगातील तीन क्रीडा संघांची चलती पाहायला मिळाली आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिद या यादीत अव्वल आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ आणि तिसऱ्या स्थानावर कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आहे. Deportes आणि Finanzas नावाच्या कंपन्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. 


सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चित असलेले क्रीडा संघ (एप्रिल 2023)



  • रिअल माद्रिद : 333 दशलक्ष

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : 303 दशलक्ष

  • चेन्नई सुपर किंग्ज : 301 दशलक्ष


आयपीएल 2023 मध्ये आरसीबीची कामगिरी कशी होती?


यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्श बंगळुरु संघाचं आव्हानं संपुष्टात आलं आहे. आरसीबी संघ आयपीलए 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, पण आरसीबीनं यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीने 14 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थान मिळवलं. विराट कोहलीनं सलग दोन शतकी खेळी करत शानदार फॉर्म दाखवून दिला. कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आठ अर्धशतकांसह 700 हून अधिक धावा केल्या. आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. यंदाही आरसीबी विजेतेपदापासून दूर राहिला असला तरी, या संघाने आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


Virat Kohli : कोहलीची 'विराट' कामगिरी! 'हा' विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील