अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील पाचव्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि  गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने सामने आले. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. मुंबई इंडियन्सचा आक्रमक बॉलर जसप्रीत बुमराहनं कॅप्टननं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. बुमरानं आजच्या मॅचमध्ये चार ओव्हर्समध्ये 14 धावा देत 3 विकेट घेतल्या. 


बुम बुम बुमराह... गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच गुजरातला होमग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. गुजरातनं 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर  168 धावा केल्या. गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक लागण्याचं कारण जसप्रीत बुमराह ठरला. 


गुजरातचा सलामीवर साहाला जसप्रीत बुमराहनं 19 धावांवर बाद केलं.बुमराहनं गुजरातला पहिला धक्का 31 धावा झाल्या असताना दिला. यानंतर जसप्रीत बुमराहनं गुजरातसाठी 45 धावा करणाऱ्या साई सुदर्शनला बाद केलं. साई सुदर्शन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. 


आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या डेव्हिड मिलरचा देखील जम जसप्रीत बुमराहनं बसू दिला नाही.  मिलरनं 11 धावा केलेल्या असतानाच बुमराहनं त्याला बाद केलं.  


जसप्रीत बुमराहची बॉलिंग कशी होती?


पहिली ओव्हर:0,0,0,4,0,W 
दुसरी ओव्हर:1,0,1,0,0,0
तिसरी ओव्हर :W,1,W,0,0,1   
चौथी ओव्हर :1L,1,2,1,1,1


जसप्रीत बुमराहचं आयपीएल करिअर


जसप्रीत बुमराहनं आयपीएलमध्ये 121 मॅच खेळल्या आहेत. बुमराहनं यामध्ये 148 विकेट घेतल्या आहेत.10 धावांवर पाच विकेट ही बुमराहची  सर्वोत्तम कामगिरी आहे. जसप्रीत बुमराहनं 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएले मध्ये बुमराहनं पहिली विकेट  विराट कोहलीची घेतली होती. 


जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 89 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्याच्या नावावर 149 विकेट आहेत. यामध्ये 19 धावांमध्ये 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बुमराहनं 62 मॅचमध्ये 74 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहनं 36 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 159 विकेट घेतल्या आहेत.   




गुजरातला 168 धावांवर रोखलं


मुंबई इंडियन्सनं प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बॉलर्सनी त्यांची कामगिरी योग्य प्रकारे पार पाडली. बुमराह शिवाय पियुष चावलानं एक विकेट घेतली. तर गेराल्ड कोत्झीनं २ विकेट घेतल्या.  गुजरातकडून साई सुदर्शननं सर्वाधिक 45 धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिलनं 31, राहुल तेवतिया 22 धावा करु शकला. 


दरम्यान, जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणामुळं 2023 च्या 16 व्या आयपीएलमध्ये  संपूर्ण सीझन खेळू शकला नव्हता.  बुमराह नसल्याचा मोठा फटका मुंबईच्या टीमला बसला होता. 


संबंधित बातम्या : 


हार्दिक पांड्याची अवस्था आता ना घर का, ना घाट का, पीटरसनचे मोठं निरीक्षण

 

IPL 2024 GT vs MI : बूम बूम बुमराहपुढे गुजरातचं लोटांगण, मुंबईनं 168 धावांवर रोखलं