Rohit Sharma Hardik Pandya, IPL 2024 : मुंबई आणि गुजरात (GT vs MI) यांच्यामध्ये अहमदाबादच्या मैदानावर आमनेसामने आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या (Rohit Sharma vs Hardik Pandya) चाहत्यांनी डिवचलं. हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी आला तेव्हा चाहत्यांनी रोहित रोहित रोहित अशी घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिकच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यामुळेच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांनी डिवचलेय. याबाबत इंग्लंडच्या माजी कर्णधारानं नोंदवलेल्या निरीक्षणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
जिओ सिनेमासोबत बोलताना केविन पीटरसन यानं महत्वाच निरीक्षण नोंदवलं. पीटरसन म्हणाला की, आयपीएलमध्ये याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला चाहत्यांनी डिवचल्याचं दिसलं नाही. हार्दिक पांड्याला मुंबईच्या नेतृत्वाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा! हार्दिक पांड्यामुळे गुजरात आणि मुंबईचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे अहदाबादमध्ये दोन्ही संघाच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला रोषाचा सामना करावा लागतोय. दरम्यान, सोशल मीडियावर पीटरसनच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. एकप्रकारे हार्दिक पांड्याची सध्याची स्थिती ना घर का ना घाट का अशीच झाली आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, अहमदाबादमध्येच अशी स्थिती आहे.. वानखेडे स्टेडियमवर एक एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात काय होईल? when was the last time an Indian Cricketer was booed in India?
चाहत्यांकडून हार्दिक पांड्या ट्रोल -
हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात आला. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी हार्दिक पांड्यासमोरच रोहित रोहित रोहित असा जयघोष सुरु केला होता. स्टेडियममधील उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात होता. नेटकऱ्यांकडून याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. काहीजण स्टेडियममध्ये रोहित शर्माच आमचा कर्णधार असल्याचे बॅनर घेऊन आल्याचे दिसले. एकूणच काय तर हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहेत.
मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?
रोहित शर्मा, ईशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, लूक वूड
राखीव खेळाडू - डेवॉल्ड ब्रेविस, आर. शेफर्ड, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी
गुजरातच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?
वृद्धीमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, अजमतुल्ह ओमरजई, राशीद खान, उमेश यादव, साई किशोर, स्पेन्सर जॉनसन
राखीव खेळाडू - बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, अभिनव मनोहर, नूर अहमद