IPL 2024 MI Vs DC Probable Playing 11 : आयपीएलच्या 17 व्या पर्वात आज (7 एप्रिल 2024) दोन सामने रंगणार आहेत. सकाळी वानखेडे मैदानावर मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये (IPL 2024 MI vs DC) आमनासामना होणार आहे. मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल, तर दिल्लीही विजयाची (MI vs DC) गाडी रुळावरत परतण्यासाठी सज्ज असेल. दिल्लीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. तर मुंबईला अद्याप तीन सामन्यात फक्त पराभवाचाच सामना करावा लागला. दुपारी साडेतीन वाजता मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी उस्तुक असेल. गुणतालिकेत दोन्ही संघाची अवस्था अतिशय दैयनीय आहे. पाचवेळा चषकावर नाव कोरणारा मुंबई संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे. मुंबईच्या विजयाची पाटी अद्याप कोरीच आहे. तर दिल्ली फक्त एका विजयासह नवव्या स्थानी आहे. दोन्ही संघाला विजय अनिवार्य आहेच, त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. 


सूर्या परतला, मुंबईच्या संघात बदल निश्चित!


दिल्ली आणि मुंबईच्या संघामध्ये काही बदल निश्चित मानले जात आहेत. मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव परतला आहे. दुखापतीनंतर सूर्या मैदानावर परत आलाय. सूर्या परतल्यामुळे मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानले जात आहेत. मुंबईची फिरकी बाजूही कमकुवत जाणवत आहे, त्यामुळे अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याला आज संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्या परतल्यामुळे नमन धीर याला बेंचवर बसवलं जाऊ शकतं. 


दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्येही बदल ?


दिल्लीच्या ताफ्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि मुकेश कुमार अद्याप तंदुरुस्त झालेले नाहीत. त्यांनी शनिवारी सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. त्याशिवाय आघाडीच्या फळीकडूनही हवी तशी सुरुवात मिळत नाही. पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श अपयशी ठऱले आहेत. वॉर्नरला आणखी संधी मिळणार की दिल्ली नवा डाव खेळणार? याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. 


मुंबई आणि दिल्ली यांच्यात वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 3 वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीनंतरच प्लेईंग 11 चं चित्र स्पष्ट होणार आहे. त्याआधी आपण दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 पाहूयात IPL 2024 MI Vs DC Probable Playing 11
 
MI Probable Playing 11 मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 


हार्दिक पंड्या (कर्णधार),रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, मोहम्मद नबी, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, टिम डेविड, आकाश मधवाल,   


Probable Playing 11 दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग 11 


पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसीख डार सलाम, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद, जेक फ्रेजर मॅकगर्क