MI vs CSK, IPL 2023 Live : चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव

IPL 2023 Match 12 MI vs CSK : आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 08 Apr 2023 10:50 PM
चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव

चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव

चेन्नईला तिसरा दक्का, शिवम दुबे बाद

चेन्नईला तिसरा दक्का, शिवम दुबे बाद

अजिंक्य रहाणे बाद, चेन्नईला दुसरा धक्का

अजिंक्य रहाणे बाद, चेन्नईला दुसरा धक्का

अजिक्य रहाणेची फटकेबाजी, 19 चेंडूत अर्धशतक

अजिक्य रहाणेची फटकेबाजी, 19 चेंडूत अर्धशतक

मुंबईची 157 धावांपर्यंत मजल

मुंबईची 157 धावांपर्यंत मजल

मुंबईला आठवा धक्का, टिम डेविड बाद

चौकार-षटकार लगावणारा टिम डेविड झेलबाद झाला. मुंबईला आठवा धक्का बसला

मुंबईला सातवा धक्का, स्टब्स बाद

मुंबईला सातवा धक्का, स्टब्स बाद

रविंद्र जाडेजा-मिचेल सँटनरची जबरदस्त फिरकी

रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर या फिरकीजोडीने भेदक मारा केला. या जोडीने मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. रविद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या तर सँटरनने दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजाने चार षटकात अवघ्या 20 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या तर सँटरने चार षटकात 28 धावा खर्च केल्या. जाडेजाने ईशान किशन, कॅमरुन ग्रीन आणि तिलक वर्मा यांची शिकार केली. तर सँटरने सूर्यकुमार आणि अरशद खान यांना तंबूत धाडले.

मुंबईला मोठा धक्का, इनफॉर्म तिलक वर्मा बाद

मुंबईला मोठा धक्का, इनफॉर्म तिलक वर्मा बाद

मुंबईची दैयनिय अवस्था, अर्धा संघ तंबूत

अरशाद खान बाद झालाय.. मुंबईला पाचवा धक्का

मुंबईची फलंदाजी ढेपाळली, 73 धावात चार गडी तंबूत

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी कोलमडली... ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर तग धरु शकले नाहीत. मुंबई चार बाद 73

सूर्य पुन्हा फ्लॉप, मुंबईला तिसरा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपाने मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झालाय. 

मुंबईला दुसरा धक्का, ईशान किशन बाद

मुंबईला दुसरा धक्का, ईशान किशन बाद... मुंबई दोन बाद 64

मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला आहे. तुषार देशपांडेने रोहित शर्माला त्रिफाळाचित केलय

मुंबईची विस्फोटक सुरुवात, इशान किशन-रोहित शर्मा मैदानावर

मुंबईची विस्फोटक सुरुवात, इशान किशन-रोहित शर्मा मैदानावर

चेन्नईने नाणेफेक जिंकली

धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सचे ट्वीट

थोड्याच वेळात वानखेडेवर रंगणार सामना

मुंबई आणि चेन्नई यांच्यात वानखेडे सामना रंगणार आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होईल

कोण बाजी मारणार ?

आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 मध्ये एक सामना खेळला असून, त्यात त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.

IPL 2023 Match 12 : मुंबई खातं उघडणार की चैन्नई बाजी मारणार?

आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 मध्ये एक सामना खेळला असून, त्यात त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.

MI Probable Playing XI : मुंबई संभाव्य प्लेईंग 11

 


रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ह्रतिक शोकीन, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), जोफ्री आर्चर

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?







आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई संघाच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळताना पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानावर दोन वर्षानंतर घरवापसी करत मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवून यंदाच्या मोसमात खातं उघडण्याचा प्रयत्न करेल.  वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.


पहिल्या सामन्यात रोहितची खराब कामगिरी -

 


आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माची बॅट शांत राहिली आहे. आरसीबीविरोधात रोहित शर्माला 10 चेंडूत फक्त 1 धावा करता आल्या. अशात चेन्नईविरोधात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.

चेन्नई सुपर किंग्सविरोधात रोहित शर्माची वानखेडेवर कशी आहे कामगिरी?

चेन्नई सुपर किंग्सविरोधात रोहित शर्माची वानखेडेवर कशी आहे कामगिरी?


87(48).
60(46).
39*(30).
19(19).
50(31).
19(14).
15(18).
13(18).
18(14).

पहिल्या विजयासाठी मुंबई मैदानात उतरणार - 

 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी फिकी पडली होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष आरामात पार केले होते. आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.  

चेन्नई सुपर किंग्सविरोधात रोहितची कामगिरी कशी?  

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा सामना होय. दोन्ही संगामध्ये काटें की टक्कर पाहायला मिळते. चेन्नईविरोधात रोहित शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडिमवर खेळताना चेन्नईविरोधात 40 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला आहे. आज रोहित शर्मा चेन्नईविरोधात मोठी खेळी करत मुंबईला आयपीएल 16 च्या हंगमातील पहिला विजय मिळवून देणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2023 Match 12 MI vs CSK :  चेन्नई (CSK) आणि मुंबई (MI) यांच्यातील सामन्याला लीगचा एल-क्लासिको असंही म्हणतात. या दोन संघाची टक्कर भारत-पाकिस्तान सामन्यासारखी चुरशीची समजली जाते. वानखेडेच्या मैदानावर हे दोन्ही संघ आज आमनेसामने असतील... मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.




MI vs CSK Match 12 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई


मुंबई इंडियन्स शनिवारी यंदाच्या मोसमातील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून पराभव झाला होता. तर दुसरीकडे चेन्नई संघाचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण, दुसऱ्या सामन्यात चेन्नईनं खातं उघडलं. 


MI vs csk Head to Head : कुणाचं पारड जड?


इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 34 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 14 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे.  




पहिल्या विजयासाठी मुंबई मैदानात उतरणार - 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी फिकी पडली होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष आरामात पार केले होते. आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.  


IPL 2023, MI vs CSK live : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.