Maharashtra weather update: देशभरात उत्तरेकडील राज्यांना तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. सांगलीत दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने एकाचा बळी गेला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात 37 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाची धग वाढली आहे. पुढील 5 हे दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. आज (26 फेब्रुवारी) मुंबईसह 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा yellow alert देण्यात आला आहे. (IMD)
हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकीकडे उत्तर पाकिस्तानला जोडून हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेशसह पंजाब,हरियाणा, राजस्थानपर्यंत तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे दक्षिणेत अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्राकार वारे वाहत असल्याने तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातही पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसही संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.
महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
दरम्यान महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान दिसत असून गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान होते. बहुतांश ठिकाणी सर्वाधिक कमाल तापमानांची नोंद झाली. मुंबईत पारा 38 अंश सेल्सिअस वर गेला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय. प्रादेशिक हवामानात केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाने आज (26 फेब्रुवारी) पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यल्लो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवसही संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे.
मंगळवारी (25 फेब्रुवारी) मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. कुलाब्यात 34.6°c तर सांताक्रुजला 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशाने वाढ होणार आहे. कोकण विभागात 37 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होईल. विदर्भात कमाल व किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी येत्या दोन दिवसात तापमान वाढणार आहे.
मंगळवारी राज्यभरात तापमानाच्या नोंदी काय झाल्या?
मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशावर स्थिरावले होते. साताऱ्यात 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापुरातही पारा 38 अंश सेल्सिअस वर होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर 36.4 अंश सेल्सिअस, बीड 35 हिंगोली 36 लातूर 37.6, धाराशिव 34.2 डिग्री सेल्सिअसवर होते. विदर्भात नागपूर 33.2, धुळे 36.4, नंदुरबार 42 वर्धा 35.7 अंश सेल्सिअस वर होते.
हेही वाचा: