IPL El Clasico MI vs CSK : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या या मोसमात, आजपासून पुन्हा दुहेरी हेडर सामने (IPL Double Header) म्हणजे दोन सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2023 मधील दुहेरी हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.


आयपीएलच्या 16 मोसमात आज दोन सामने खेळवले जातील. यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई (CSK) आणि मुंबई (MI) यांच्यातील सामन्याला लीगचा एल-क्लासिको असंही म्हणतात. या दोन संघाची टक्कर भारत-पाकिस्तान सामन्यासारखी चुरशीची समजली जाते.


एल-क्लासिको म्हणजे काय?


एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. स्पॅनिश फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. खेळाडूंसोबतच चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


यंदाच्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा सामना असेल. चेन्नई संघाने एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला.


मुंबई इंडियन्स पहिल्या विजयाच्या शोधात 


मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातील हा दुसरा सामना असेल. अद्याप मुंबई संघाला खातं उघडता आलेलं नाही. मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 मधील पहिल्या विजय शोधात आहेत. पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरूकडून पराभव झाला होता. या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे बंगळुरूच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरले होते.


CSK Playing XI : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), दीपक चहर, आरएस हंगरगेकर


MI Probable Playing XI : मुंबई संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ह्रतिक शोकीन, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), जोफ्री आर्चर


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs CSK, Preview : रोहित विरुद्ध धोनी, वानखेडेवर जंगी सामना; मुंबई पलटण पहिला विजय मिळवणार की, चेन्नई मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवणार