Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Predection : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) लढत पाहायला (RR vs DC IPL 2023 Match 11) मिळणार आहे. गुवाहाटीमध्ये 8 एप्रिल रोजी बरसापारा स्टेडिअमवर (Barsapara Stadium) सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा हा तिसरा सामना असेल. त्यांचा याआधीच्या पहिल्या सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.


DC vs RR Match 11 Preview : दिल्ली आणि राजस्थान आमने-सामने


राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना आहे. दिल्ली (DC) संघाला प्रतिस्पर्धी राजस्थान (RR) चा पराभव कडून खातं उघडण्याची संधी आहे. राजस्थान संघाला घरच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममधील परिस्थितीची चांगली सवय झाली आहे. असं असलं तरी, पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धचा त्यांचा मागच्या सामन्यात झालेला पराभव लक्षात घेता दिल्ली विरुद्ध विजय मिळवून त्यांना स्पर्धेत पुन्हा स्थान मिळवता येईल.


DC vs RR, Head to Head : कुणाचं पारड जड?


इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघाची स्थिती सारखी आहे. 26 सामन्यांपैकी राजस्थान आणि दिल्ली दोन्ही संघानी प्रत्येकी 13 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. 


RR vs DC IPL 2023 Match 11 : कधी आणि कुठे होणार सामना?


राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 8 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर (Barsapara Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RR vs DC Playing 11 : गुवाहाटीमध्ये राजस्थान आणि दिल्ली भिडणार, 'हे' 11 शिलेदार मैदानात उतरणार, खेळपट्टी कशी आहे?