Bhuvneshwar Kumar Flop in IPL : भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) एका खेळाडूचं भवितव्य काहीसं अंधारात दिसत आहे. टीम इंडियाच्या (Team India) एका स्टार खेळाडूच्या करिअरवर सध्या टांगती तलवार आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर आता आयपीएलमध्ये (Indian Premier League) या खेळाडूची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर आता आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येही भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) फारशी खास कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळेच आता त्याचा टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग अवघड दिसत आहे.


आयपीएल 2023 मध्येही निराशाजनक कामगिरी


खराब फॉर्ममुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर भुवनेश्वरला आता आयपीएल 2023 मध्ये आपला उत्तम खेळ दाखवण्याची संधी आहे. मात्र, सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये भुवनेश्वर खराब फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या खेळाडूचा भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनाचा मार्ग कठीण होऊ शकतो. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत, तर इकॉनॉमी 9 च्या वर गेली आहे. विशेष म्हणजे भुवनेश्वर ने यंदाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या सामन्यातही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.


आयपीएलमध्येही भुवीला खास कामगिरी करता आलेली नाही


टीम इंडियाचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या कामगिरीवर सध्या सर्वांचं लक्ष आहे.  टी-20 विश्वचषक 2022 वेळेस म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पासून भुवनेश्वर कुमार टीम इंडियातून बाहेर आहे. भुवीला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्याचवेळी त्याची आयपीएलमधील कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. अशा स्थितीत त्याची कारकीर्द आता धोक्यात आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात एडन मार्करामच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही विशेष ठरली नाही. 


मागील पाच टी-20 सामन्यांत भुवनेश्वर कुमारची कामगिरी



  • 2-0-25-0 विरुद्ध इंग्लंड (ENG), ॲडलेड ओव्हल, T20 विश्वचषक 2022 उपांत्य फेरी

  • 3-0-12-1 विरुद्ध न्यूझीलंड (NZ), माउंट मौनगानुई, 2022

  • 4-0-35-0 विरुद्ध न्यूझीलंड (NZ), नेपियर, 2022

  • 3-0-36-0 विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR), हैदराबाद, आयपीएल 2023 (IPL 2023)

  • 2-0-19-1 विरुद्ध लखनौ (LSG), आयपीएल 2023 (IPL 2023)


भुवनेश्वर कुमारला केंद्रीय करारातून वगळलं


टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी टीम इंडियासाठी भुवनेश्वर कुमार प्रमुख गोलंदाज होता. काही सामने सोडता त्याची कामगिरीही उत्कृष्ट होती. असं असतानाही त्यांना केंद्रीय करारातून वगळल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. 33 वर्षीय भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळलं. भुवनेश्वरला भविष्यात टीम इंडियात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जर तो पुन्हा आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बनला तर तो टीम इंडियाचा भाग नक्कीच बनू शकतो. पण आयपीएलमध्येही त्याला अद्याप काही खास कामगिरी करता आलेली नाही. आगामी सामन्यांमध्ये भुवीचं नजीब उजळत का हे पाहावं लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी, लखनौच्या नवाबांचा हैदराबादवर पाच विकेटने विजय