IPL 2023 Playoffs Scenario : आयपीएलच्या (IPL 2023) सध्या सुरु असलेल्या सोळाव्या हंगामातील आज शेवटचे डबल हेडर (Double Header Match) म्हणजे दुहेरी सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना मुंबई (MI) विरुद्ध हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. तर, दुसऱ्या सामन्यात बंगळुरु (RCB) संघाला गुजरातचं (GT) आव्हान असेल. दरम्यान, मुंबई (MI) आणि बंगळुरु (RCB) संघाला प्लेऑफमध्ये (IPL Playsoffs Race) पोहोचण्यासाठी त्यांचे आजचे सामने जिंकावे लागतील. दरम्यान, मुंबई (MI) संघाला प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकण्यासह बंगळुरुच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागेल. 


मुंबई इंडियन्स म्हणतेय 'ये रे ये रे पावसा...'


आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी संघ चौथ्या तर मुंबई संघ पाचव्या स्थानावर आहे. आरसीबी आजचा सामना जिंकल्यास त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळेल. दरम्यान, बंगळुरुच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. बंगळुरुमध्ये शनिवारपासून पावसानं हजेरी लावली आहे. गुजरात विरुद्ध आरसीबी सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास मुंबईसाठी या स्पर्धेत पुढे जाण्याची ही संधी असेल.


मुंबई आणि आरसीबीसह राजस्थानही प्लेऑफच्या स्पर्धेत


बंगळुरुचा (RCB) सामना पावसामुळे (Bengaluru Rain Prediction) रद्द झाल्यास मुंबई संघाची (MI) लॉटरी लागून त्यांना थेट प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) प्रवेश मिळेल. त्यामुळे मुंबई संघ आणि चाहते बंगळुरुमध्ये पाऊस पडावा, अशी प्रार्थना करत असावेत. गुजरात, चेन्नई आणि लखनौ संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. तर शेवटच्या जागेसाठी मुंबई, बंगळुरु आणि राजस्थानही स्पर्धेत आहे. मुंबई आणि बंगळुरु संघाला आजच्या सामन्यात पराभव झाल्यास राजस्थान (RR) संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल.


मुंबई इंडियन्सची प्लेऑफपर्यंतची वाट अवघड


मुंबई इंडियन्सला त्यांचा शेवटचा साखळी सामना  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज त्यांच्या घरच्या वानखेडे मैदानावर खेळणार आहे. या सामन्यात मुंबईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल. सध्या मुंबईचा नेट रनरेट -0.128 आहे. तर आरसीबीचा नेट रनरेट +0.180 असून मुंबई संघापेक्षा जास्त आहे. जर मुंबई संघ विजयासह नेट रनरेट वाढवण्यात यशस्वी ठरला तर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. याउलट असं झालं नाही आणि आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकला तर बंगळुरु थेट प्लेऑफसाठी सहज पात्र ठरेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs GT : आरसीबीची चिंता वाढली! बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी; आजच्या सामन्यावर पावसाचं सावट