MI vs SRH Match Prevdiction : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 69 वा सामना आज मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) या दोन संघात रंगणार आहे. रविवारी, 21 मे रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH vs MI) संघ आमने-सामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई संघाला आजचा सामना जिंकणं फार आवश्यक ठरणार आहे. हैदराबाद संघाचं प्लेऑफमधी आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी हैदराबाद संघ मुंबई संघाकडून पराभवाचा वचपा काढू शकतो. या हंगामात 25 व्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला होता.


मुंबईला हैदराबादचं आव्हान


मुंबई इंडियन्सचा लखनौ विरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात पराभव झाला. त्यामुळे मुंबईला आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकावा लागेल. मुंबईसाठी चांगली बातमी म्हणजे आज मुंबई त्यांच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर परतले आहेत. होमग्राऊंडवर शेवटचा सामना जिंकण्यासाठी मुंबईची पलटन सज्ज झाली आहे.


मुंबईची पलटन वानखेडेवर खेळण्यासाठी सज्ज


मुंबई संघाने आतापर्यंत 186, 213 आणि 200 च्या एकूण धावसंख्येचा पाठलाग करताना घरच्या मैदानावरली सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. मुंबईचे फलंदाज विशेषतः सूर्यकुमार यादवची वानखेडेवर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आहे.


सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. परिणामी, ऑरेंज आर्मीने यंदाच्या मोसमात तेरापैकी नऊ सामने गमावले. काही खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार आणि हेनरिक क्लासेनचे शतक हे सर्वात प्रमुख आहेत. 


MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबईने 20 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई संघाने आजचा सामना जिंकल्यास त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.






MI vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


एक जागा, तीन स्पर्धक, दोन सामने... प्लेऑफचा चौथा संघ कोणता?