Heavy Rain in Bengaluru, GT vs RCB : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील शेवटचा लीग सामना आज, 21 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात रंगणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. आरसीबीच्या (RCB) गुजरात टायटन्सविरुद्ध (GT) शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. मात्र यामध्ये पावसामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.


आरसीबी संघाला गुजरातचं आव्हान


आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आरसीबी संघाचा प्लेऑफ तिकीट आजच्या सामन्यात त्यांच्या विजयावर अवलंबून आहे. बंगळुरु आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास संघ प्लेऑफमध्ये जाण्याची संधी गमावू शकतो. आजच्या सामन्याआधी बंगळुरु संघासमोर अडचणी वाढताना दिसत आहे. यामुळे आरसीबी संघ आणि त्याच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. बंगळुरूमध्ये शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यासोबतच रविवारीही बंगळुरुमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे.


बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना


आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील शेवटचा 70 वा लीग सामना आज बंगळुरु आणि गुजरात (GT vs RCB) या दोन संघात रंगणार आहे. 21 मे रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला आजचा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : कोलकाताचा पराभव करत लखनौ प्लेऑफमध्ये दाखल, पॉईंट्स टेबलची सध्याची परिस्थिती काय?