LSG vs PBKS IPL 2024 Live Score: पंजाबविरोधात घरच्या मैदानावर केएल राहुल फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाची धुरा आज निकोलस पूरन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. निकोलस पूरन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनचा पंजाब संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. पंजाबच्या ताफ्यात कोणताही बदल नसल्याचे शिखर धवन याने नाणेफेकीनंतर सांगितले. (Lucknow Super Giants vs Punjab Kings)
केएल राहुल दुखापतग्रस्त -
लखनौचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केएल राहुल फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. केएल राहुल याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण अनुभवी कर्णधार मैदानात नसणं, लखनौसाठी मोठा धक्का मानला जातोय.
लखनौची प्लेईंग 11 -
क्विंटन डि कॉक (विकेटकीपर) , देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (कर्णधार), आयुष बडोनी, क्रृणाल पांड्या, रवि बिश्नोई, मोसीन खान, मयांक यादव, एम सिद्धार्थ
राखीव खेळाडू - अॅश्टोन टर्नर, नवीन उल हक, अमित मिश्रा, दीपक हुड्डा, के गौतम
LSG XI: Quinton de Kock, Devdutt Padikkal, KL Rahul, Marcus Stoinis, Nicholas Pooran, Ayush Badoni, Krunal Pandya, Ravi Bishnoi, Mohsin Khan, Mayank Yadav, M Siddharth
Subs: Ashton Turner, Naveen-ul-Haq, Amit Mishra, Deepak Hooda, K Gowtham
पंजाबचे 11 शिलेदार कोणते ?
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू - प्रभसिमरन, रायली रुसो, हरप्रीत भाटिया
Punjab Kings XI: Shikhar Dhawan (capt), Jonny Bairstow, Sam Curran, Liam Livingstone, Jitesh Sharma (wk), Shashank Singh, Harpreet Brar, Harshal Patel, Kagiso Rabada, Rahul Chahar, Arshdeep Singh
Subs: Prabhsimran Singh, Rilee Roussouw, Tanay Thagarajan, Vidwath Kaverappa, Harpreet Bhatia