Virat Kohli And Gautam Gambhir News Marathi: आयपीएलच्या (2023) शेवटच्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या हंगामात देखील कोहली आणि गंभीरमध्ये शाब्दिक बाचाबाची होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यात याउलटच पाहायला मिळाले. त्यामुळे मैदानावर उपस्थित असणारे प्रेक्षक देखील अवाक् झाले.


आरसीबी आणि केकेआर सामन्यातील टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गंभीर येतो आणि सर्वप्रथम तो कोहलीशी हस्तांदोलन करतो आणि नंतर त्याला मिठी मारतो. यादरम्यान दोघांमध्ये काही संवाद होतो आणि दोन्ही दिग्गजांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक चाहते आश्चर्यचकित झाले.






भेटीमागील इनसाइड स्टोरी काय?


भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने कोहली आणि गंभीरच्या भेटीमागील महत्वाची माहिती सांगितली आहे. गौतम गंभीर सिनियर आहे. त्यामुळे गंभीरनेच कोहलीच्या भेटीसाठी पुढाकार घेतला. कधी कधी तुम्ही रेषा ओलांडता. पण गोष्टी निघून गेल्यावर, जेव्हा तुम्ही भविष्यात भेटता किंवा तुम्ही आता भेटता, तेव्हा दोघांमध्ये चांगल्याप्रकारे भेट होते, असं इरफान पठाणने स्टार स्पोट्सवर बोलताना सांगितले.


रवी शास्त्री-सुनील गावसकर काय म्हणाले?


विराट कोहली आणि गौतम गंभीरची मैदानात गळाभेट होताच भारतीय क्रिकेट संघाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या गळाभेटीसाठी केकेआरला फेअरप्ले पुरस्कार', असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. तर 'केवळ फेअरप्ले पुरस्कारच नाही, तर ऑस्कर पुरस्कार देखील', असं सुनील गावसकर म्हणाले. सामन्यादरम्यान समालोचन करताना दोघांनी ही प्रतिक्रिया दिली.


केकेआरने आरसीबीचा केला पराभव-


घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. संघासाठी कोहलीने 59 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला.


संबंधित बातम्या:


IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table


LSG vs PBKS Dream11 Prediction: राहुल, पूरन, रबाडा..., आज कोणाला कर्णधार बनवाल?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल