LSG vs SRH, IPL 2023 Live: लखनौचा हैदराबादवर पाच विकेटने विजय
IPL 2023, Match 10, LSG vs SRH : हैदराबादसमोर आज लखनौचे आव्हान असेल.. हैदराबाद पहिल्या विजयासाठी मैदानात उतरत आहे.
लखनौचा हैदराबादवर पाच विकेटने विजय
लखनौला पाचवा धक्का, शेफर्ड बाद
लखनौला चौथा धक्का.....कृणाल पांड्या बाद
लखनौची विजयाकडे वाटचाल... राहुलची दमदार फलंदाजी
काइल मायर्स आणि दीपक हुड्डा स्वस्तात बाद झाले
लखनौची दमदार सुरुवात, राहुल-काइल मायर्सची फटकेबाजी
हैदराबादची 121 धावांपर्यंत मजल
अमित मिश्रा ऑन फायर, लागोपाठ दोन फलंदाजांना पाठवले तंबूत
हैदराबादला सहावा धक्का, आदिल रशीद बाद
हैदराबाद संघाला पाचवा धक्का बसला आहे.
मार्करम शून्यावर बाद.. हैदराबादचे चार गडी तंबूत
हैदराबादला पहिला धक्का, मयंक आग्रवाल बाद
मयांक अग्रवाल आणि अनमोलप्रीत सिंह सलामीला उतरले आहेत.
केएल राहुल (कर्णधार), काइल मायर्स, दीपक हुड्डा, स्टॉयनिस, निकोलस पूरन, आर. शेफर्ड, क्रृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकद, रवि बिश्नोई
मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंह (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडिन मार्करम (कप्तान), हॅरी ब्रूक, वॉशिंगटन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल राशिद
सनरायजर्स हैदाराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ प्रथम गोंलदाजी करणार आहे. एडन मार्करम याचे हैदराबाद संघात पुनरागमन झालेय. त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौलही जिंकला आहे.
खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मोठी धावसंख्या उभारता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या स्पिरीटने आणि उर्जेने खेळेल. अनमोलप्रीत सिंह सलामीला येणार आहे, असे नाणेफेकीनंतर एडन मार्करम याने सांगितले. आजच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्क वूड याला ताप असल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय मागील सामन्यात आवेश खान दुखापतग्रस्त झाला होता, तोही या सामन्यात खेळणार नाही, असे राहुलने सांगितले.
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), आदिल रशीद, उमरान मलिक, टी नटराजन
लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान
लखनौ संघासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधार केएल राहुलचा फॉर्म. राहुलची खेळी सध्या चिंतेचा विषय आहे. यंदाच्या मोसमातील सलग दोन सामन्यांमध्ये केएल राहुलची निराशाजनक खेळी पाहायला मिळाली आहे. डीकॉकच्या आगमनानंतर ओपनिंगमध्ये राहुलला फायदा झाल्यास लखनौ संघासाठी हे फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांनी लखनौसाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
हैदराबाद संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे कारण अद्याप संघाला खातं उघडता आलेलं नाही. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला होता. हा त्यांचा दुसरा सामना असेल. नवा कर्णधार एडन मार्करमच्या पुनरागमनानंतर सनरायझर्स हैदराबाद आपलं खातं उघडण्याच्या तयारीत आहे. संघाचा मूळ कर्णधार मार्करमच्या अनुपस्थितीत, भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता नव्या कर्णधारामुळे संघाला बळकटी मिळणार का हे पाहावं लागणार आहे
सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत एक सामना खेळला असून त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये याआधी एकच सामना झाला आहे. हा सामना लखनौने जिंकला होता. या सामन्यात लखनौनं 169 धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र, हैदराबादला 157 धावाचं करता आल्या होत्या. या मोसमात लखनौने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना 50 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना चेन्नईविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव करत 12 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची संघाला अद्यापही खातं उघडता आलेलं नाही. हैदराबादचा राजस्थान रॉयल विरुद्ध पहिला सामन्या पराभव झाला. यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला.
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना 7 एप्रिलरोजी लखनौ येथील एकाना स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
पार्श्वभूमी
LSG vs SRH Live Score : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 7 एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील लखनौ संघाचा हा तिसरा सामना असेल तर हैदराबाद संघाचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ विजयाच्या आशेने मैदानावर उतरतील.
IPL 2023, LSG vs SRH Match 10 Preview : लखनौ विरुद्ध हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत एक सामना खेळला असून त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
SRH vs LSG Head to Head : कुणाचं पारड जड?
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये याआधी एकच सामना झाला आहे. हा सामना लखनौने जिंकला होता. या सामन्यात लखनौनं 169 धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र, हैदराबादला 157 धावाचं करता आल्या होत्या. या मोसमात लखनौने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना 50 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना चेन्नईविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव करत 12 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची संघाला अद्यापही खातं उघडता आलेलं नाही. हैदराबादचा राजस्थान रॉयल विरुद्ध पहिला सामन्या पराभव झाला. यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला.
IPL 2023, SRH vs LSG : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना 7 एप्रिलरोजी लखनौ येथील एकाना स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023, SRH vs LSG live : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -