LSG vs SRH, IPL 2023 : सनरायजर्स हैदाराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ प्रथम गोंलदाजी करणार आहे. एडन मार्करम याचे हैदराबाद संघात पुनरागमन झालेय. त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौलही जिंकला आहे. अमित मिश्रा याला लखनौने प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. क्विंटन डि कॉक याला लखनौच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. लखनौचा संघ काइल मायर्स याच्यासोबत गेला आहे.
खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मोठी धावसंख्या उभारता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या स्पिरीटने आणि उर्जेने खेळेल. अनमोलप्रीत सिंह सलामीला येणार आहे, असे नाणेफेकीनंतर एडन मार्करम याने सांगितले. आजच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्क वूड याला ताप असल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय मागील सामन्यात आवेश खान दुखापतग्रस्त झाला होता, तोही या सामन्यात खेळणार नाही, असे राहुलने सांगितले.
LSG vs SRH Live Score: सनराइजर्स हैदराबादची प्लेइंग 11
मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंह (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडिन मार्करम (कप्तान), हॅरी ब्रूक, वॉशिंगटन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल राशिद
LSG vs SRH Live Score: लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेवन
केएल राहुल (कर्णधार), काइल मायर्स, दीपक हुड्डा, स्टॉयनिस, निकोलस पूरन, आर. शेफर्ड, क्रृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकद, रवि बिश्नोई
SRH vs LSG Head to Head : कुणाचं पारड जड?
लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये याआधी एकच सामना झाला आहे. हा सामना लखनौने जिंकला होता. या सामन्यात लखनौनं 169 धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र, हैदराबादला 157 धावाचं करता आल्या होत्या. या मोसमात लखनौने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना 50 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना चेन्नईविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव करत 12 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची संघाला अद्यापही खातं उघडता आलेलं नाही. हैदराबादचा राजस्थान रॉयल विरुद्ध पहिला सामन्या पराभव झाला. यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला.