Suyash Sharma Viral : ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाताने आरसीबीचा दारुण पराभव केला. या विजयात शार्दूल ठाकूर याच्यासोबत युवा सुयेश शर्मा याने मोठं योगदान दिलेय. सुयेश शर्मा याने कोलकात्याकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला अन् इम्पॅक्ट पाडून गेला. सूयश शर्माने आरसीबीविरोधात पदार्पणात तीन विकेट घेतल्या, यामुळे तो चर्चेत आहे. पण नेटकऱ्यांना सुयेश शर्मामध्ये ऑलम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रो दिसला.. होय.. नीरज चोप्रो आणि सुयेश शर्मा या दोघांचा लूक आणि चेहरेपट्टी सेमच दिसत आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. नीरज चोप्रोने आयपीएलमध्ये पदार्पण केलेय, असे म्हणत ट्वीट केलेय. नीरज चोप्रो काहीही करु शकतो.. असे एका युजर्सने म्हटलेय.. पाहूयात सोशल मीडियावर काय चर्चा सुरु आहे.. 














































Suyash Sharma IPL Debut : सुयश शर्माचा 'ड्रीम डेब्यू'


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात एक नवखा खेळाडू सुयश शर्मा याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने सुयश शर्माचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समावेश केला. कोलकाताकडून पदार्पण करणाऱ्या सुयश शर्माचा हा 'ड्रीम डेब्यू' ठरला.


आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 3 विकेट


सुयशने 4 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. सुयश शर्माने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिनेश कार्तिकला 9 आणि अनुज रावतला अवघ्या एक धावांवर तंबूत परत पाठवला आणि सर्वांनाच चकित केलं. त्यानं 13व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद केलं. त्यानं कर्ण शर्माला एका धावेवर बाद करत तिसरी विकेट घेतली. 



आरसीबीचा दारुण पराभव 


लॉर्ड शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81  धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला. 


205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी वादळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी कोलकात्याच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 4.5 षटकात 44 धावांची सलामी दिली. विराट कोहली 21 धावा काढून बाद झाला. विराटनंतर फाफही फार काळ मैदानावर टिकला नाही. फाफही 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यानेही विकेट फेकली. मॅक्सवेल याला फक्त पाच धावा करता आल्या. महत्वाचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोलमडली.