LSG Vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूनं लखनौ सुपर जायंट्ससमोर (Lucknow Super Giants Vs Royal Challengers Bangalore) 182 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघानं 20 षटकात सहा विकेट्स गमावून धावा केल्या आहेत. या सामन्यात फाफ डू प्लेसिसनं कर्णधार खेळी केली आहे. त्यानं 64 चेंडूत 96 धावा केल्या आहेत.
नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातील पहिल्याच षटकात अनुज रावतच्या रुपात बंगळुरूच्या संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. दरम्यान, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरला. परंतु, पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्रुणाल पांड्यानं मॅक्सवेलला माघारी धाडलं. त्यानं 11 चेंडूत 23 धावा केल्या. परंतु, फाफ डू प्लेसिसनं संघाची एक बाजू संभाळली. त्याने अखरेच्या षटकापर्यंत फलंदाजी करत 64 चेंडूत 96 धावा केल्या. फाफ आपलं शतक पूर्ण करेल, असं वाटतं असताना दुष्मंता चमिरानं त्याला झेल बाद केलं. लखनौकडून दुष्मंता चमिरानं आणि जेसन होल्डर यांनी प्रत्यकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, क्रुणाल पांड्यानं एक विकेट्स मिळवली.
लखौनचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-