LSG vs RCB : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 31 वा सामना आहे. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (LSG vs RCB) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून लखनौने नाणेफेक जिंकली आहे. लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बंगळुरुचे खेळाडू आधी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघानी एकही बदल न करता आजचा सामना खेळण्याचा निर्णय़ घेतला आहे.



नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणाऱ्या आजच्या सामन्यात आमने-सामने असणाऱ्या लखनौ आणि बंगळुरु (LSG vs RCB) संघाने आतापर्यंत प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. तर दोघांनीही दोन सामने गमावले देखील आहेत. दोघांची आतापर्यंतची कामगिरी समसमान असल्याने आजचा विजय दोघांपैकी एका संघाला गुणतालिकेत झेप घेण्यास मदत करेल. आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकही बदल केला नसला तरी नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


लखनै अंतिम 11


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान 


बंगळुरु अंतिम 11  


अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज


हे देखील वाचा-