Obed McCoy Pushpa Viral Video: कोलकात्याविरुद्ध मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) सोमवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं सात धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील राजस्थानचा चौथा विजय होता. ज्यामुळं राजस्थानचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या विजयात वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयनं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, विकेट्स घेतल्यानंतर ओबेड मॅकॉयनं पुष्पा सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


राजस्थान विरुद्ध कोलकाता सामना रोमांचक ठरला. अखेरच्या षटकापर्यंत कोणता संघ बाजी मारणार? हे सांगण कठीण होतं. परंतु, अखेरच्या षटकात राजस्थानकडून गोलंदाजी करण्यसाठी आलेल्या ओबेड मॅकॉयनं उत्कष्ट गोलंदाजी करत सामना राजस्थानच्या बाजूनं झुकवला. कोलकाताच्या डावात 20 व्या षटकात उमेश यादव आणि शेल्डन जॅक्शन मैदानात उपस्थित होते आणि कोलकात्याला विजयासाठी 11 धावांची गरज होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ओबेड मॅकॉयनं शेल्डन जॅक्शनची विकेट्स घेतली. त्यानंतर कोलकाता संघाच्या विजयाची आशा जागवणारा उमेश यादवलाही त्यानं माघारी धाडलं. ज्यामुळं राजस्थानच्या संघानं सात धावांनी हा सामना जिंकला. 


व्हिडिओ-



कोलकात्याविरुद्ध पहिल्या सामना खेळण्यानंतर ओबेड काय म्हणाला?
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30 व्या सामन्यात ओबेड मॅकॉयनं राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. कोलकात्यानं सामना जिंकल्यानंतर ओबेड मॅकॉय म्हणाला की,"मला खूप आनंद होत आहे. कोलकात्याविरुद्ध माझा पहिला सामना होता. ज्यामुळं मी दबावात होतो. परंतु, आता मला चांगलं वाटतं आहे. हे केवळ भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कठोर परिश्रमाबाबत होता. मला स्वत:वर विश्वास आहे. परंतु, मी खूप कमी क्रिकेट खेळलो आहे." 


हे देखील वाचा-