IPL 2022: टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांनी एका चेंडूवर चौकार किंवा षटकार  मारून चार किंवा सहा घेतल्याचं आपण नेहमीच पाहतो. परंतु, सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट यांच्यात (RR Vs KKR) मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी इतिहास घडवला. या सामन्यात दोघांनी धावून चार धावा काढल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, एखाद्या फलंदाजानं धावून चार धावा पूर्ण केल्या आहेत. 


नाणेफेक गमावून राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल मैदानात होते. या षटकातील अखेरच्या चेंडूवर बटलरनं प्वाइंटच्या दिशेनं शॉट मारला. या चेंडूवर व्यंकटेश अय्यर चांगलं क्षेत्ररक्षण करत चौकार वाचवला. पण त्याचा थ्रो विकेटकिपरकडं पोहचण्याआधीच बटलर आणि पडिक्कलनं धावून चार धावा काढल्या. 


व्हिडिओ- 



राजस्थाननं सात धावांनी सामना जिंकला
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला.


हे देखील वाचा-