Who is Obed McCoy: आयपीएल 2022 मधील तिसराव्या सामन्यात राजस्थाननं कोलकात्याला (RR Vs KKR) पराभूत करून या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या सामन्यात राजस्थानच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरनं (Jos Buttler) झुंजार शतक ठोकून कोलकात्यासमोर 218 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर गोलंदाजीत ओबेड मॅकॉयनं (Obed McCoy) भेदक मारा करत कोलकात्याच्या फलंदाजाला रोखलं. ज्यानंतर ओबेड मॅकॉय कोण आहे? अशा चर्चांना उधाण आलं आहे. 


आयपीएल 2022 च्या तिसाव्या सामन्यात ओबेड मॅकॉयनं राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात ओबेड मॅकॉयनं दोन विकेट्स घेतले. त्यानं कोलकात्याचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्शन आणि अखेरच्या षटकात विजयाच्या आशा वाढवणारा उमेश यादवला माघारी धाडलं. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थानच्या संघानं मॅकॉयला त्याची मूळ किंमत 75 लाखात विकत घेतलं. 


ओबेड मॅकॉयचा जन्म 4 जानेवारी 1997 साली झाला. डाव्या हाताच्या कॅरेबियन गोलंदाजाची ताकद स्लोअर बॉल आहे. त्याचा वापर तो डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या प्रकारे करतो. एवढेच नव्हेतर, सामन्याच्या सुरुवातीत तो 140 च्या वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. 


कोलकात्याविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर ओबेड काय म्हणाला?
"मला खूप आनंद होत आहे. कोलकात्याविरुद्ध माझा पहिला सामना होता. ज्यामुळं मी दबावात होतो. परंतु, आता मला चांगलं वाटतं आहे. हे केवळ भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कठोर परिश्रमाबाबत होता. मला स्वत:वर विश्वास आहे. परंतु, मी खूप कमी क्रिकेट खेळलो आहे." 


ओबेड मॅकॉयचं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2018 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत मॅकॉनची वेस्ट इंडीजच्या संघात निवड करण्यात आली होती.  त्यानं  24 आक्टोबर 2018 मध्ये भारताविरुद्ध पहिला सामना खेळला. त्यानंतर 8 मार्च 2019 मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. टी-20 विश्वचषक 2019 मध्ये तो वेस्ट इंडीजच्या संघाचा भाग होता. 


हे देखील वाचा-