LSG vs RCB, Live Updates : आरसीबीचा 14 धावांनी विजय, लखनौचं आव्हान संपलं
LSG vs RCB IPL 2022 Live Updates, Eliminator : लखनौ आणि आरसीबी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भिडणार आहेत.. पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारची शतकी खेळी आणि त्यानंतर जोश हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केलाय. आरसीबीने 208 धावांचा बचाव करताना लखनौच्या संघाला 193 इतख्या धावांत रोखले. यासह आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर लखनौचं आव्हान संपुष्टात आलेय. क्वालिफायर 2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान यांचा सामना होणार आहे.
राहुलनंतर क्रृणाल पांड्याही बाद
केएल राहुलच्या रुपाने लखनौला पाचवा धक्का बसला आहे. जोश हेजलवूडने राहुलला 79 धावांवर बाद केले
मोक्याच्या क्षणी हर्षल पटेलने मार्कस स्टॉयनिसला 9 धावांवर बाद केले...
एकाच षटकात दोन षटकार मारणाऱ्या दीपक हुड्डाला हसरंगाचा अडथळा केला दूर... हुड्डा 45 धावा काढून बाद झाला
लखनौचा कर्णधार केएल राहुलने 43 चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे.. राहुलने हेजलवूडच्या चेंडूवर षटकार लगावत अर्धशतक झळकावलेय
क्विंटन डिकॉक आणि मनन वोहराला बाद करत आरसीबीने लखनौला दोन धक्के दिले आहेत..पण कर्णधार राहुलची फटकेबाजी
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator IPL 2022 : रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या आहेत. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केलाय. लखनौला विजयासाठी 20 षटकांत 208 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. एलिमेनेटर सामन्यात पराभूत होणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे.
लोमरोर याचा उत्कृष्ट झेल घेणाऱ्या केएल राहुलने दिनेश कार्तिकचा झेल सोडला तर मोहसीन खानने रजत पाटीदारला जिवनदान दिले.. रजत पाटीदारला मनन वोहराने दुसरे जिवनदान दिले... झेल सुटल्याचा फायदा घेत दोघांनी फटकेबाजी केली.. डेथ ओव्हरमध्ये दोघांनी धावांचा पाऊस पाडला..
एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले.. पाटीदारने अवघ्या 49 चेंडूत शतक झळकावले... एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.. पाटीदारने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला... प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे.
रजत पाटीदार आणि कार्तिकने धावांचा पाऊस पाडलाय.. दोघांनी अखेरच्या षटकात धुलाई केली
बिश्नोईने महिपाल लोमरोरला बाद करत आरसीबीला चौथा द्का दिला... लोमरोर 14 धावा काढून बाद झाला...
विराट कोहलीनंतर मॅक्सवेलही बाद झाला.. क्रृणाल पांड्याने मॅक्सवेलला 9 धावांवर बाद केले
रजत पाटीदारने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावत आरसीबीचा डाव सावरलाय. पाटीदारने 28 चेंडूत अर्धशतक झळकावलेय.
जम बसलेल्या विराट कोहलीला आवेश खान याने तंबूत धाडले... विराट कोहली 25 धावा काढून बाद झाला
पहिल्याच षटकात कर्णधार फाफ बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीचा डाव सावरलाय
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस गोल्डन डकचा शिकार ठरला आहे.
लखनौ- आरसीबीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पावसामुळं सामन्यात व्यत्यय आलं होतं. मात्र, काही वेळानंंतर हा सामना सुरू करण्यात आला आहे. या सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणार संघ क्लालिफायर 2 मध्ये गुजरातशी भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपणार आहे.
क्विंटन डिकॉक, केएल राहुल (कर्णधार), इविन लुईस, दीपक हुड्डा, मनन वोरा, मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, डी. चमिरा, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल रोमरोर, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वानंदु हसरंगा, जोस हेजलवूड, मोहम्मद सिराज
करो या मरोच्या सामन्यात लखनौ आणि आरसीबी संघात बदल करण्यात आले आहे. लखनौ संघात दोन बदल झाले आहेत. तर आरसीबीने आपल्या संघात एक बदल केलाय. लखनौने कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डरला वगळले आहे. त्यांच्याजागी क्रृणाल पांड्या आणि दुष्मंता चमिराला स्थान देण्यात आलेय. आरसीबीने मोहम्मद सिराजला संघात स्थान दिलेय. सिद्धार्थ कौलला आरसीबीने वगळलेय.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आहे... आरसीबीला प्रथम फंलदाजीसाठी आमंत्रित केलेय
ईडन गार्डनवरील कव्हर काढण्यात आले आहेत.. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे
९.४० ला खेळ सुरु झाला तर एकही षटक कमी होणार नाही, सामना पूर्ण २०-२० षटकांचा होणार,
१२ वाजता खेळ सुरु झाला तर सामना पाच पाच षटकांचा होणार.
पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होणार.
सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकली नाही तर लखनौ विजयी घोषित करणार आणि आरआर सोबत त्यांचा सामना होणार
ईडन गार्डनमध्ये पावसाने उपस्थिती दर्शवल्यामुळे नाणेफीकाला उशीर होणार आहे...
विराट कोहलीकडे मोठ्या विक्रमाची संधी आहे... आजच्या सामन्यात अर्धशतक करताच विराट कोहली आयपीएलमध्ये 50 पेक्षा जास्त धावा 50 वेळा करणारा पहिला खेळाडू होणार आहे.. विराट कोहलीच्या नावावर सध्या 44 अर्धशतके आणि पाच शतकांचा समावेश आहे.. विराट कोहलीने आज 50 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात
लखनौ सुपर जायंट्सला आरसीबीचा पराभव करायचा असल्यास कर्णधार केएल राहुल, क्विंटन डिकॉक, दीपक हुड्डा, आवेश खान आणि मोहसिन खान यांना शानदार प्रदर्शन करावे लागेल..
आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. मुंबई आणि चेन्नईनंतर सर्वाधिकवेळा प्लेऑफ खेळणारा आरसीबीचा संघ आहे. पण आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक उंचावता आलेला नाही. अशात विराट कोहली, दिनेश कार्तिक, फाफ डु प्लेसिस, वानिंदु हररंगा, जोश हेजलवुड आणि ग्लेन मॅक्सवेलकडून आरसीबीला मोठ्या आशा आहे.
अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीने मोहम्मद सिराजला आराम दिला होता.. त्याच्या जागी सिद्धार्थ कौलला संघात स्थान दिले होते.. पण सिद्धार्थ कौल खपच महागडा ठरला.. त्यामुळे मोक्याच्या सामन्यात सिरजाला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोलकात्याची खेळपट्टी सिरजासाठी पोषक आहे. त्याशिवाय हर्षल पटेलही फिट आहे.
आरसीबीचा हुकमी एक्का हर्षल पटेल तंदुरुस्त असून एलिमिनेटरमध्ये खेळण्यास सज्ज आहे. आरसीबीच्या अखेरच्या साखळी सामन्यात हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे हर्षल पटेलला अर्ध्यातून मैदान सोडावे लागले होते... त्याला चार षटकेही गोलंदाजी करता आली नव्हती. पण आता हर्षल पटेल तंदुरुस्त झाला असून संघात परतण्यास सज्ज झाला... हर्षल पटेल परतल्यामुळे आरसीबीची ताकद नक्कीच वाढणार आहे.
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते 2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते.
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम खेळत आहे. या हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने 14 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे.
पार्श्वभूमी
LSG vs RCB IPL 2022 Live Updates, Eliminator : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे. 'करो या मरो'च्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघआचे आव्हान संपुष्टात येणार आहे.. तर विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कोलकात्यामुळे दोन दिवसांपासून पाऊस पडत होता.. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे... नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
लखनौची दमदार कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम खेळत आहे. या हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने 14 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे.
आरसीबीचा मधील प्रवास
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते 2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -